शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 15:21 IST

नोकराने ५८ किलो चांदी चोरली. एवढी मोठी चोरी होऊनही त्याचा सुगावाही व्यापाऱ्याला नव्हता. पोलिसांमार्फत माहिती दिल्यानंतर व्यापाऱ्याला ही माहिती मिळाली.

कानपूरमधून चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेथे व्यापाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे नोकराने ५८ किलो चांदी चोरली. एवढी मोठी चोरी होऊनही त्याचा सुगावाही व्यापाऱ्याला नव्हता. पोलिसांमार्फत माहिती दिल्यानंतर व्यापाऱ्याला ही माहिती मिळाली.

अश्विनी नावाचा व्यापारी कानपूरच्या धोबी बाजार भागात सोन्या-चांदीचा व्यवसाय करतो. अलीकडेच त्याचा एक नोकर लल्लू ५८ किलो चांदी देण्यासाठी गेला होता. याच दरम्यान, वाटेत स्कूटर सोडून चांदी घेऊन पळून गेला. नोकराने केलेल्या या चोरीची माहितीही व्यापाऱ्याला नव्हती.

कानपूर कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही मोठी चोरी उघडकीस आली. वास्तविक, घटनेच्या दिवशी कानपूर कोतवाली पोलीस त्याच रस्त्यावर तपासणी करत होते. तपासणीदरम्यान पोलिसांना एक स्कूटर रस्त्यावर दिसली. त्यावेळी स्कूटरसोबत कोणीही नव्हतं.

पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडीच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला. घटनास्थळी स्कूटर उभी असल्याची माहिती पोलिसांनी मालकाला दिली, मात्र तरीही आपल्यासोबत एवढी मोठी घटना घडल्याचं मालकाच्या लक्षात आलं नाही. मालक अश्विनी यांनी सांगितले की, स्कूटर घेऊन जाणारा नोकर त्यांच्याकडे काम करतो.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा खुलासा

या माहितीनंतर व्यावसायिकाने चौकशी केली असता त्यांना एका नोकराच्या माध्यमातून ५८ किलो चांदी गायब झाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी नोकर लल्लूला अटक केली आहे.

व्यापाऱ्याने सांगितलं की, आरोपी लल्लू गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्याकडे काम करत होता. आपला विश्वासू नोकर एवढी मोठी चोरी करेल याची आपल्याला कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. 

पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक 

या घटनेबाबत एसीपी आशुतोष कुमार म्हणाले की, एक स्कूटर रस्त्यावर पडून असल्याचं दिसलं, तिच्या नंबरप्लेटवरून मालकाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर चांदीसह नोकर बेपत्ता झाल्याची माहिती मालकाला नसल्याचं समोर आलं.

एसीपी आशुतोष कुमार यांनी सांगितलं की, या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आणि आरोपी तरुण लल्लू आणि त्याच्या अन्य साथीदाराला ५८ किलो चांदीसह अटक करण्यात आली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSilverचांदीPoliceपोलिस