शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये खुनाची मालिका सुरूच; आठवडाभरानंतर एका भाजीविक्रेत्याची हत्या!

By अझहर शेख | Updated: August 24, 2023 19:45 IST

हल्लेखोरांच्या शोधासाठी गुन्हे शाखांचे दोन पथक तसेच अंबड गुन्हे शोध पथक रवाना करण्यात आले आहे

नाशिक : शहरात खुनाची मालिका सुरूच असून आठवडाभरात पुन्हा अंबड पोलीस ठाण्याच्याच हद्दीत एका भाजीविक्रेत्याची भर दिवसा दुचाकीस्वार हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सापासप वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. गुरुवारी (दि.२४) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जुने सिडकोमध्ये हा हल्ला झाला.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुने सिडको शॉपिंग सेंटर चौकात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार ते सहा हल्लेखोरांनी भाजीविक्रेता संदीप आठवले ( 22 ,रा.लेखानगर) या युवकावर प्राणघातक हल्ला केला. गंभीरपणे जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन आठवले याचा जागीच मृत्यू झाला. या खुनी हल्ल्याचा थरार येथील दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. आठवले रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याने बघून दुचाकीस्वार हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळतात अंबड पोलीस ठाण्याच्या पथकासह गुन्हे शाखा, इंदिरानगर, एमआयडीसी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी आठवले याचा मृतदेह तात्काळ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलविला. यावेळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले.पोलिसांनी त्वरीत बंदोबस्त याठिकाणी वाढविला.

हल्लेखोरांच्या शोधासाठी गुन्हे शाखांचे दोन पथक तसेच अंबड गुन्हे शोध पथक रवाना करण्यात आले आहे. आठवले याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात येतात रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात त्याचा मित्रपरिवार व नातेवाईकांनी गर्दी केली. यामुळे जिल्हा रुग्णालयात सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त वाढविण्यात आला. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील पंधरवड्यापासून सातत्याने खुनाच्या घटना घडत आहेत. या पंधरवड्यात चौथ्या युवकाने या भागात अशा प्राणघातक हल्ल्यात आपला जीव गमावला आहे. यामुळे अंबड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीने प्रचंड डोके वर काढले असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अंबड पोलिसांना मात्र गुन्हेगारांवर अंकुश लावण्यास अद्याप अपयश येत आहे. टिप्पर गॅंग सक्रिय झाल्याचा आरोप

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकेकाळी धुमाकूळ घातलेल्या टिप्पर गॅंग चे काही गुन्हेगार हे पुन्हा या भागात सक्रिय झाले आहे, असा आरोप मयत आठवले यांच्या नातेवाईकांनी केला आहे. येथील चौकात आठवले हा त्याच्या मितत्रासोबत नाश्त्याला आले होते, याचवेळी हल्लेखोर हातात शस्त्र घेऊन आले आणि त्यांनी आठवले याच्यावर हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस