शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नींचा सिरिअल किलर...! पहिलीचा रहस्यमयी मृत्यू, दुसरी भाओजीच्या भावासोबत पळून गेली, तिसरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 12:45 IST

औरंगाबादच्या शेखपुरा गावातील हे प्रकरण आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

औरंगाबाद : बिहारच्या औरंगाबादमध्ये एका पतीची धक्कादायक कृत्ये समोर आली आहेत. लग्न झालेल्या व्यक्तीची कहाणी विचित्र आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचा रहस्यमयी मृत्यू झाला आहे. दुसरी भावोजीच्या भावासोबत पळून गेली तर तिसरीचा त्याने खून केला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

या व्यक्तीचे नाव सुबेलाल पासवान आहे. औरंगाबादच्या शेखपुरा गावातील हे प्रकरण आहे. सुबेलालने हुंड्यासाठी तिसऱ्या पत्नीचा छळ केला होता, यानंतर तिची हत्या केली होती. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने तिचा मृतदेह देखील जाळला होता. स्थानिक लोक त्याला पत्नींचा सिरिअल किलर म्हणत आहेत. 

लोकांच्या म्हणण्यानुसार सुबेलालकडे कोणतीही पत्नी थांबत नाही. एकतर तिचा रहस्यमयी मृत्यू होतो किंवा ती पळून जाते. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या आईच्या जबाबावरून एफआयआर नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे. कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात अर्ज दिल्याचे उपरा पोलिस ठाण्याचे प्रमुख मनोज कुमार तिवारी यांनी सांगितले. 

आई कुस्मी देवीने म्हटले आहे की, तिने आपली मुलगी चंद्रावती हिचा विवाह हिंदू रितीरिवाजांनुसार सुबेलालसोबत 4 वर्षांपूर्वी केला होता. ऐपतीनुसार हुंडाही दिला होता. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चालले. त्यानंतर सुबेलालने माझ्या मुलीवर पैसे आणि हुंड्यासाठी अत्याचार करण्यास सुरुवात केली. यातूनच गुरुवारी त्याने मुलीची हत्या केली आणि मृतदेह जाळून टाकला. 

सुबेलाल पासवान याचा पहिला विवाह 2002 मध्ये झाला होता. 2003 मध्ये त्यांना मुलगी झाली. 2004 मध्ये तिचा अचानक मृत्यू झाला होता. यानंतर त्याने तियप गावात राहणाऱ्या जलेंद्र पासवान यांची मुलगी ममता कुमारीसोबत दुसरे लग्न केले होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतर आरोपी सुबेलालने पत्नी ममता कुमारीला गुजरातमधील दमण घेऊन गेला. एका खासगी कंपनीत काम करत होता. तेथेही तो पत्नीशी भांडण करत असे. वैतागून पत्नी भावोजीच्या भावासोबत पळून गेली.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीBiharबिहार