शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवसात सुनावली बलात्काऱ्याला शिक्षा, न्यायालयाचा सुपरफास्ट निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 13:36 IST

एका ऩ्यायालयाने बलात्कार प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत आरोपीवर चार्जशिट दाखल करून नवा पायंडा पाडला आहे.

उज्जैन - न्यायालयात खटला दाखल झाल्यावर वर्षांनुवर्षे चालणारे खटले ही आपल्या न्यायव्यवस्थेची ओळख. पण मध्य प्रदेशमधील एका ऩ्यायालयाने आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत आरोपीवर चार्जशिट दाखल करून नवा पायंडा पाडला आहे. एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीला बालन्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणी आरोपीविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल झाले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याच दिवशी त्याला शिक्षा सुनावली. बलात्काराच्या कुठल्याही प्रकरणात सुनावण्यात आलेली ही सर्वात वेगवान शिक्षा आहे. घाटिया पोलीस ठाण्याचे प्रभारी एनएस कनेश यांनी सांगितले की, "पीडित मुलीचे कुटुंबीय 15 ऑगस्ट रोजी तिला आपल्या एका शेजाऱ्याच्या 14 वर्षीय मुलासोबत खेळण्यासाठी सोडून कामावर गेले होते. पण त्याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर हा मुलगा फरार झाला होता. अखेर 16 ऑगस्ट रोजी त्याला एका नातेवाईकाच्या घरातून अटक करण्यात आली."पोलिसांनीही या प्रकरणाचा वेगाने तपास केला. तसेच चार दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून सोमवारी न्यायमूर्ती तृप्ती पांडे यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायाधीशांनी काही तासांतच आपला निकाल सुनावला. आता अल्पवयीन आरोपीला सिवनी बालसुधारगृहात शिक्षा म्हणून दोन वर्षे राहावे लागेल.  

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाMadhya Pradeshमध्य प्रदेश