शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अजनीत थरार : पत्नी व तिच्या प्रियकराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:00 IST

पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केली. रविवारी मध्यरात्री अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देकुऱ्हाडीने दोघांवरही घाव, अनैतिक संबंधातून हत्याकांड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केली. रविवारी मध्यरात्री अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. किरण कुवरलाल बरमय्या आणि शिवा बालाघाटी अशी मृतांची नावे आहेत, तर कुवरलाल बरमय्या (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे.

मानेवाडा बेसा मार्गावरील कल्याणेश्वर नगर जवळच्या बाळकृष्ण नगरात भाड्याच्या खोलीत कुवरलाल आणि त्याची पत्नी राहत होते. तो बांधकामस्थळी मिस्त्रीचे काम करत होता, पत्नी किरणही त्याच्यासोबत कामाला जायची. शिवादेखील मजुरीचे काम करत होता. शिवा नातेवाईक असल्याचे किरणने कुवरलालला सांगितले होते. तो अधूनमधून कुवरलालच्या घरी यायचा. अलीकडे त्याचे घरी येणे वाढले होते. काही दिवसांपूर्वी अचानक घरी परतलेल्या कुवरलालला शिवा आणि किरण संशयास्पद स्थितीत दिसले. त्यामुळे या दोघांच्या संबंधावर कुवरलाल संशय घेऊ लागला. त्यांच्यात अनैतिक संबंध असल्याची कुवरलालला शंका होती.पोलिसांच्या माहितीनुसार, शिवा दोन दिवसापासून कुवरलालच्या घरी थांबला होता. रविवारी रात्री शिवा, कुवरलाल आणि किरण दारू पिऊन जेवले. त्यानंतर हे तिघे झोपी गेले. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास शिवा आणि किरण खोलीतून बाहेर पडले. झोपेचे सोंग घेऊन पडलेला कुवरलाल त्यांच्यावर नजर ठेवून होता. काही वेळानंतर तो बाहेर आला. तेव्हा शिवा आणि किरण हे दोघे त्याला अंधारात जवळजवळ दिसले. आधीच चिडून असलेल्या कुवरलालने शिवा आणि किरणवर कुºहाडीचे घाव घालून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. किंकाळी ऐकून शेजाऱ्यांनी खिडकीतून बघितले तेव्हा त्यांना हा थरारक प्रकार दिसला. त्यांनी अजनी पोलिसांना कळविले. ठाणेदार प्रदीप रायान्नावार सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.त्यावेळी कुवरलाल तेथेच बसून होता. पोलिसांनी दोघांचे मृतदेह मेडिकलमध्ये पाठविले आणि कुवरलालला ताब्यात घेतले. त्याने घटनास्थळीच पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली.दोघांचेही दुसरे लग्नपोलिसांच्या प्राथमिक चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, कुवरलाल, किरण आणि शिवा हे तिघेही बालाघाटमधील रहिवासी आहेत. कुवरलालला पत्नी आणि मुले आहेत. मात्र, त्यांना सोडून तो नागपुरात आला. किरणलाही पती आणि मुले आहेत. मात्र तिनेही नागपुरात येऊन कुवरलालसोबत गेल्या काही वर्षांपासून संसार थाटला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनnagpurनागपूर