शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जाब विचारल्याने तरूणाचा खून, पिंपरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 01:28 IST

कानाखाली मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून विमाननगर आयटी पार्कमधील एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शास्त्राने वार करीत खून केला.

पिंपरी - कानाखाली मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून विमाननगर आयटी पार्कमधील एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शास्त्राने वार करीत खून केला. ही घटना पिंपरीतील डिलक्स चौक येथे घडली.मंजीत मोतीलाल प्रसाद (रा. २२, काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी धर्मेश श्यामकांत पाटील, यशवंत ऊर्फ अनिल लक्ष्मण गायकवाड (वय २०, दोघेही रा. गोकुळधाम हौसिंग सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी), स्वप्निल संजय कांबळे (वय २५, रा. मोनिका अपार्टमेंटजवळ, आदर्शनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर इतर साथीदार फरार आहेत. मोहन संभाजी देवकाते (वय २५, रा. खराडीरोड, चंदननगर, पुणे) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंजीत हे विमाननगर येथील डब्ल्यू.एन.एस. या कंपनीत डाटा एन्ट्री तसेच कॉल सेंटरचे काम पाहत होते. या कंपनीतील कर्मचाऱ्यांना सोडविण्यासाठी फिर्यादी देवकाते हे शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून चालले होते. दरम्यान, टेम्पो ट्रॅव्हलर पिंपरीतील डिलक्स चौकात आला असता दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी देवकाते यांना गाडी थांबविण्याचा इशारा केला. देवकाते यांनी गाडी थांबविली असता ‘क्या हो गया’ असे मंजित प्रसाद हे देवकाते यांना म्हणताच आरोपींपैकी एकाने मंजित यांच्या कानाखाली मारली. त्यानंतर कानाखाली का मारली, असे विचारण्यासाठी मंजित खाली उतरले.आरोपींनी मंजित प्रसाद यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चॉपरने खांद्यावर, छातीवर, कमरेवर सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मंजित यांच्यावर थेरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. अटक आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी