शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! प्रेयसीची हत्या करुन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 19:43 IST

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देप्रेयसीची गळा चिरुन हत्या केल्यानंतर स्वत:च्या गळ्यावर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्नदोघांमध्ये भांडण झाल्याने त्याने अंकिताच्या गळ्यावर सुऱ्याने वार करून हत्या केली.

मीरारोड - भाईंदर पूर्व येथील एका दुकानात २२ वर्षीय प्रेयसीची गळा चिरुन हत्या केल्यानंतर स्वत:च्या गळ्यावर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न प्रियकराने केल्याची धक्कादायक घटना आज घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.तलाव मार्गावर असलेल्या बाळकृष्ण लिला इमारतीत चंदन आचार्य यांचे महालक्ष्मी डेअरी व जनरल स्टोर्सचे दुकान आहे. चंदन हा मुंबईला गेला असल्याने त्याचा भाऊ कुंदन आचार्य हा दुकानात होता. त्यावेळी समोरच्याच शालीभद्र इमारतीत राहणारी अंकिता रावल ही दुकानात आली. दुकानात दोघांचे भांडण झाले असता रागाच्या भरात कुंदन याने धारदार सुऱ्याने अंकिताचा गळा चिरला. नंतर त्याने स्वत:च्या गळ्यावर देखील सुरा फिरवला आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. कुंदन हा दुकानाच्या बाहेर पदपथावर येऊन रक्तबंबाळ अवस्थेत पडल्यानंतर लोकांच्या घडला प्रकार लक्षात आला. परंतु, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुंदनला कोणी हात लावायला तयार नव्हते. अखेर काही तरुणांनी त्याला नजिकच्या खाजगी रुग्णालयात नेले. या घटनेची माहिती कळताच उपअधिक्षक शशीकांत भोसले, नवघरचे पोलीस निरीक्षक राम भालसिंग आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अंकिताचा जागीच मृत्यू झाला होता. तर कुंदनच्या श्वासनलिकेला छेद गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. परंतु, कुंदनकडून पोलीसांना मिळालेल्या माहिती नुसार दोघांचे प्रेम संबंध होते. दोघांमध्ये भांडण झाल्याने त्याने अंकिताच्या गळ्यावर सुऱ्याने वार करून हत्या केली.गेल्या ५ ते ६ वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. लग्न करण्याचा अंकिता सतत आग्रह धरत होती. घरच्यांना या प्रेमप्रकरणाबद्दल कल्पना होती. परंतु, लग्नावरुन घरच्यांची संमती होत नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली असली तरी त्यांच्या निकटवर्तियांकडून यास दुजोरा मिळालेला नाही.

टॅग्स :MurderखूनbhayandarभाइंदरPoliceपोलिसSuicideआत्महत्या