शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! ९ वर्षाच्या मुलीच्या हत्येतील मुख्य आरोपीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 22:00 IST

मृतदेह कुजलेल्या अवस्थेतील आहे.

ठळक मुद्देमुख्य आरोपी असलेला प्रकाश हरी राठोड (३८) याचा मृतदेह उत्तन भागातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.तिचा मृतदेह ड्रमसह १२ नोव्हेंबर रोजी आकाशने कसारा घाटात टाकून दिला असल्याचे समोर आले. मृतदेह तपासणी आणि चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे.

मीरारोड - ९ वर्षाच्या मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह कसारा घाटात फेकण्यात आल्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेला प्रकाश हरी राठोड (३८) याचा मृतदेह उत्तन भागातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेतील आहे.उत्तनच्या धावगी मार्गावरील रिध्दी सिध्दी इमारतीत राहणारा प्रकाश राठोड याने औरंगाबदच्या कन्नड तालुक्यातील चाफेनेर येथून आपल्या मावसभावाची ९ वर्षांची मुलगी भारती चव्हाण हिला तिच्या आईकडून फिरण्यासाठी व शिक्षणासाठी ६ महिन्यापूर्वी घरी घेऊन आला होता. परंतु भारतीशी संपर्क होत नसल्याने तसेच राठोडचा फोन लागत नसल्याने आई हिना हिने ४ डिसेंबर रोजी उत्तन गाठले. पण प्रकाशच्या घराला टाळे असल्याने ५ डिसेंबर रोजी तिच्या फिर्यादीवरून उत्तन पोलीसांनी प्रकाश विरोधात गुन्हा दाखल करुन घेतला होता.उपअधिक्षक शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास सुरु झाला. पोलीसांनी प्रकाशची पत्नी अनिता व नंतर भाचा आकाश चव्हाण याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता भारतीच्या हत्येचा उलगडा झाला. प्रकाशने चिमुरड्या भारतीला तीच्या आईची दिशाभुल करुन घरातील घरकाम करण्यासाठी आणले होते. घरकाम करण्यासाठी तिचा छळ केला जात होता. प्रकाश व अनिता तिला मारहाण करत असत. ७ नोव्हेंबर रोजी लहानग्या भारतीने अस्वच्छता केली म्हणून प्रकाशने तिचा गळा आवळून खून केला.तिचा मृतदेह प्लास्टिक ड्रममध्ये टाकून त्यात माती व सिमेंट टाकून ठेवले. तिचा मृतदेह ड्रमसह १२ नोव्हेंबर रोजी आकाशने कसारा घाटात टाकून दिला असल्याचे समोर आले.पोलीसांनी अनिता व आकाशला अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी असलेला प्रकाश मात्र सापडत नव्हता. पोलीस त्याचा शोध घेत होते. तोच बुधवारी सकाळी उत्तनच्या धावगी डोंगर भागातील जंगलातून दुर्गंधी येत असल्याने तेथून जाणाऱ्या पादचाऱ्यांनी पोलीसांना कळवले. पोलीसांनी शोध घेतला असता एका झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या पण कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. सदर मृतदेहाच्या कपड्यातील खिशात सापडलेल्या आधार ओळखपत्रावरुन प्रकाशचा मृतदेह असल्याचा निष्कर्ष पोलीसांनी काढला आहे. त्याचा मृतदेह तपासणी आणि चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे.

टॅग्स :MurderखूनDeathमृत्यूmira roadमीरा रोडPoliceपोलिस