शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 16:35 IST

आसामच्या गुवाहाटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

आसामच्या गुवाहाटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जयदीप देव नावाच्या तरुणाने आपल्या आईचा मृतदेह तब्बल तीन महिने घरात ठेवला. तिच्यावर अंत्यसंस्कार केले नाहीत. जयदीपची आई पूर्णिमा देव यांच्या मृत्यूनंतर मुलाने मृतदेह तसाच ठेवला. अंत्यसंस्काराची काही व्यवस्थाच केली नाही. तो त्याची दैनंदिन काम करत होता. आई जिवंत आहे असंच तो सर्वांना दाखवत होता. 

जयदीप नियमित बँकेत जाऊन पैसे काढत होता. जयदीपच्या विचित्र वागण्याने त्याच्या शेजाऱ्यांना थोडा संशय आला, त्यांनी अखेर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस जयदीपच्या घरी पोहोचले असता त्यांना एका बेडवर महिलेची हाडं आढळून आली. पूर्णिमा देव असं मृत महिलेचं नाव आहे. पतीच्या निधनानंतर पूर्णिमा जयदीपसोबत राहत होत्या असं तपासात समोर आलं. पौर्णिमा यांचे शेजाऱ्यांशी चांगले संबंध होते, पण अनेक दिवस त्या दिसल्या नाहीत, तेव्हा शेजाऱ्यांना त्यांची काळजी वाटू लागली.

घर बंद असल्याने आणि आजूबाजूला कचरा साचल्याने शेजाऱ्यांची चिंता आणखी वाढली. शेजाऱ्यांनी जयदीपला त्याच्या आईबद्दल विचारलं आणि घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ करण्यास सांगितलं तेव्हा त्याने धक्कादायक उत्तर दिलं. आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला असं सांगितलं. तसेच घर साफ करण्यास नकार दिला. त्याच्या विचित्र वागण्यामुळे शेजाऱ्यांनी अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

जयदीपचं मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्याने आई पौर्णिमा देव यांना अनेक वर्षे घरात डांबून ठेवलं आणि घराबाहेरही पडू दिलं नाही. मृत्यूनंतर जयदीपने अंत्यसंस्कारही केले नाहीत आणि आईच्या मृतदेहासोबत जगत राहिला. जयदीपकडे कोणतंही काम नव्हतं आणि तो त्याच्या आईच्या पेन्शनवर अवलंबून होता. शेजाऱ्यांना सुरुवातीला वाटलं की तो स्वतःसाठी आणि आईसाठी बाहेरून जेवण आणत आहे, पण सत्य काही वेगळंच होतं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस