ज्येष्ठ गायिकेचे मंगळसूत्र लांबविले; डाेंबिवलीतील रहदारीच्या रस्त्यावर घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:27 AM2023-02-28T10:27:22+5:302023-02-28T10:27:35+5:30

रामनगर हद्दीत घडणारे गुन्हे स्थानिक पोलिसांकडून उघडकीस येत असले तरी चोरीच्या गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे.

Senior singer's Mangalsutra lengthened; Incident on traffic road in Dembivli | ज्येष्ठ गायिकेचे मंगळसूत्र लांबविले; डाेंबिवलीतील रहदारीच्या रस्त्यावर घटना

ज्येष्ठ गायिकेचे मंगळसूत्र लांबविले; डाेंबिवलीतील रहदारीच्या रस्त्यावर घटना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : एकट्या दुकट्या महिलेला गाठून त्यांच्या गळ्यातील किमती ऐवज दुचाकीवरून धूमस्टाइलने चोरटे लांबवत असल्याचे प्रकार अधूनमधून सुरू असताना रविवारी रात्री नऊच्या सुमारास येथील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका, संगीत समीक्षक शुभदा श्रीकांत पावगी (७१) यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अशाच प्रकारे लांबविल्याची घटना घडली आहे. पूर्वेतील टिळक रोड या रहदारीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

रविवारी फडके रोड, आप्पा दातार चौकातील श्री गणेश मंदिरात  कार्यक्रम संपल्यानंतर शुभदा या आपल्या मुलासोबत टिळक रोडवरील आपल्या घरी परतत होत्या. त्यावेळी या रस्त्यावरील ब्राह्मण सभेजवळील मेरवान केक  शॉपच्या समोरून जात असताना समोरून आलेल्या दुचाकीवर मागे बसलेल्या चाेरट्याने त्यांच्या मानेवर जोराची थाप मारून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन,मंगळसूत्र हिसकावले. 

रामनगर हद्दीत चोरट्यांचा सुळसुळाट
रामनगर हद्दीत घडणारे गुन्हे स्थानिक पोलिसांकडून उघडकीस येत असले तरी चोरीच्या गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, सायकल चोरी आणि घरफोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. चोर आता रहदारीच्या रस्त्यावरही बिनदिक्कत गुन्हे करू लागल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Senior singer's Mangalsutra lengthened; Incident on traffic road in Dembivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.