शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्याच्या पत्नीस मॅसेज पाठवणाऱ्या इसमाला बदडले; भाईदरमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 12:59 IST

भाईंदर पश्चिमेच्या दीडशे फूट मार्ग, डिमार्ट जवळ वालचंद दर्शन ही इमारत आहे.

मीरारोड - एकाच इमारतीत राहणाऱ्या एका इसमाने दुसऱ्याच्या पत्नीस पाठवलेल्या मॅसेज वरून चांगलाच राडा झाला. तुझ्या पतीने मला मॅसेज का पाठवला ? असा जाब एका विवाहितेने त्या पतीच्या पत्नीस विचारल्या वरून झालेला वाद हाणामारी पर्यंत पोहचल्याची घटना भाईंदरच्या एका इमारतीत घडली आहे.

भाईंदर पश्चिमेच्या दीडशे फूट मार्ग, डिमार्ट जवळ वालचंद दर्शन ही इमारत आहे. हा परिसर काहीसा उच्चभ्रू वस्तीचा म्हणून ओळखला जातो. पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादी नुसार, सदर इमारतीच्या बी विंग मध्ये अमित प्रविणचंद शहा (४१) हे पत्नी तेजल (३६) व दोन मुलांसह राहतात. १४ सप्टेंबर रोजी रात्री अमित हे पत्नीसह त्यांच्या इमारतीतल्या सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त भोजन समारंभात भोजन करुन इमारतीच्या पाठीमागे फोनवर बोलत बोलत होते. बोलता बोलता ते पत्नीसह इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारा वर पोहचले. त्यावर ए विंग मध्ये राहणारे अनिल पृथ्वीराज जैन हे त्यांची पत्नी मंजु सह आले व आवाज देऊन थांबवण्यास सांगितले. 

मंजुने तेजलला जाब विचारला की, तुझ्या पतीने माझ्या मोबाईलवर मँसेज का पाठविला ?.  त्यावरून तेजलने मंजुला कसला मँसेज आहे मला दाखव असे सांगितले.  त्यावेळी अनिल ने अमितची काँलर पकडुन बाहेर येण्यास सांगितले.  बाचाबाची होऊन अनिलने शिवीगाळ करत अमितला भिंतीवर ढकलले तसेच हेल्मेटने व ठोशाबुक्क्यांनी बेदम चोपले. 

मंजू व प्रशांत जैन यांनी देखील अमितला बदडले. मंजु हिने तेजलच्या सुद्धा गालावर चापट लगावली. इमारती मधील दोन कुटुंबातील राडा पाहून अन्य राहिवाश्यानी मारामारी सोडवली . या मारहाणीत अमितचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादी वरून १५ सप्टेंबर रोजी भाईंदर पोलीस ठाण्यात अनिल व त्याची पत्नी मंजू जैन आणि प्रशांत जैन या तिघांवर विविध कलमां खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस