शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षात राहिलेले प्रवाशाचे लग्नाचे दागिने  घेऊन गावी पळालेल्या रिक्षाचालकाकडून मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 21:55 IST

Crime News : मुलीच्या लग्नासाठी सभागृहात जाताना रिक्षात विसरलेल्या प्रवाश्याचे दागिने व कपडे नवघर पोलिसांनी महिन्याभराच्या तपासानंतर परत मिळवून दिले .

 मीरारोड - मुलीच्या लग्नासाठी सभागृहात जाताना रिक्षात विसरलेल्या प्रवाश्याचे दागिने व कपडे नवघर पोलिसांनी महिन्याभराच्या तपासा नंतर परत मिळवून दिले . रिक्षाचालकाने दागिने व कपडे थेट आपल्या उत्तर प्रदेश येथील गावी नेऊन ठेवले होते.भाईंदर पूर्वेच्या कस्तुरी पार्क मध्ये राहणारे तुकाराम कदम यांच्या मुलीचे जेसलपार्क येथील सभागृहात ११ डिसेम्बर रोजी लग्न होते . सकाळी त्यांच्या पत्नी ह्या अडीच लाखांचे दागिने व कपडे घेऊन रिक्षातून पोहचल्या . परंतु घाई गडबडीत उतरताना दागिने व कपड्यांची पिशवी रिक्षातच राहिली .दागिने व कपडे रिक्षात राहिल्याचे लक्षात आल्यावर नवघर पोलिसात या बाबत फिर्याद दिली होती . पोलीस निरीक्षक संपत पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे सह भालेराव , शिंदे जाधव यांच्या पथकाने तपास सुरु केला .पोलिसांनी आधी त्या रिक्षाचा क्रमांक शोधून काढला . त्या आधारे रिक्षा मालकाला गाठून चौकशी केली असता त्याने सदर रिक्षा हि मूळचा उत्तर प्रदेशचा पण काशीमीरा येथे राहणारा रिक्षा चालक मोहम्मद मकसूद अली ह्याला चालवण्यास दिल्याचे सांगितले .पोलिसांनी मकसूदच्या घरी तपासणी केली असता तो त्याच्या उत्तर प्रदेश येथील मूळ गावी गेला होता . पोलिसांना ११ जानेवारी रोजी मकसूद हा गावा वरून आल्याचे समजताच त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली . अखेर रिक्षात दागिने व कपड्यांची सापडलेली ती पिशवी आपण मूळगावी नेऊन ठेवल्याचे त्याने कबूल केले .पोलिसांनी त्याला मूळ गावा वरून दागिने व कपड्यांची पिशवी आणायला लावली . २० जानेवारी रोजी कदम यांचे दागिने व कपडे पोलिसांच्या ताब्यात आले . नवघर पोलिसांनी लग्ना वेळी गेलेले दागिने महिन्या भरा नंतर कदम कुटुंबियांना मिळवून दिल्या बद्दल कटुक होत आहे . परंतु पोलिसांनी मकसूद वर मात्र केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर