शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

बियाणे कंपनीच्या कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या; पोलिसांच्या श्वानाने काढला मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 14:05 IST

यवतमाळात कुजलेला मृतदेह आढळला

यवतमाळ: बियाणे कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी यवतमाळात उघडकीस आली. सुनील घनबहादूर रा. वरुड जऊळका ता. आकोट  जि. अकोला असे मृताचे नाव आहे. आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही. ही आत्महत्येची घटना रहस्यमयरीत्या उघडकीस आली. 

यवतमाळातील पळसवाडी कॅम्प स्थित जिल्हापरिषद पदाधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या मागील बाजूला अज्ञात व्यक्तीची कवटी पडून असल्याची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. श्वान पथकाला पाचारण केले असता या श्वानाने दारव्हा रोडवरील विशाल लॉजच्या मागील बाजूपर्यंत माग काढला. तेव्हा या घटनेचा उलगडा झाला. सुनील घनबहादूर याने लॉजच्या मागील बाजूला झाडाला कापडाने गळफास लावून आत्महत्या केली. परंतु त्याच्या मृतदेहाचे श्वानांनी लचके तोडले.

मृतेदह कुजलेला होता, गळफास घेतलेल्या अवस्थेत अंगातील कपडेच होते, शरीराचा बहुतांश भाग कुजून खाली पडला होता. यावरून ही आत्महत्या अनेक दिवस आधी झाली असावी असा अंदाज पोलीस वर्तवित आहे. सुनीलची पत्नी अकोला  जिल्हा पोलीस दलात लिपिक पदावर कार्यरत आहे. सुनील बियाणे कंपनीत असून तो नेहमीच विशाल लॉजमध्ये राहायचा. त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्याची बॅग, वाहन लॉजमध्येच होते. मात्र त्याचा पत्ता नव्हता म्हणून लॉज मालकाने सुनीलच्या पुतण्याला याची माहिती दिली. त्यावरून पुतण्याने यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून ६ नोव्हेंबरपासून सुनील बेपत्ता असल्याचे फिर्याद नोंदविली. त्याचा शोध सुरू असतानाच बुधवारी अखेर त्याच्या आत्महत्येचा उलगडा झाला.

आत्महत्येच्या ठिकाणापासून श्वानांनी ही कवटी बऱ्याच दूर तोंडात धरुन आणली असावी, असा अंदाज आहे. या कवटीमुळेच सुनीलच्या आत्महत्येला वाचा फुटली. आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पाेलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धारणे, यवतमाळच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहर ठाणेदार धनंजय सायरे व पथकाने घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :YavatmalयवतमाळPoliceपोलिस