शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बघ्यांची गर्दी अन् काडीमोडीच्या गुंडांची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 21:48 IST

पेट्रोलपंप लुटण्याचा होता डाव : सीसीटीव्हीत झाले कैद

ठळक मुद्देलोकमतच्या हाती लागलेल्या या गुन्ह्याच्या व्हिडिओतून हा प्रकार पुढे आला.  पेट्रोलपंपावरून निघाल्यानंतर या गुंडांनी एमआयडीसी परिसरात लुटमारीचे दोन गुन्हे केले.

नरेश डोंगरेनागपूर : किरकोळ अंगयष्टी असलेल्या दोन गुंडांनी वाडीच्या एका पेट्रोलपंपावर रविवारी रात्री प्रचंड दहशत निर्माण केली. त्यांचा पेट्रोलपंप लुटण्याचाच मनसुबा होता. त्यासाठी त्यांनी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणच्या या पेट्रोलपंपावर सुमारे १० मिनिटे हैदोस घातला. विशेष म्हणजे, यावेळी पेट्रोलपंपावर पाच ते सात कर्मचारी अन् आठ ते दहा वाहनधारकही होते. मात्र, या सर्वांनीच बघ्याची भूमिका वठविणे पसंत केले. त्यामुळे काडीमोडीच्या या गुंडांची भाईगिरी खपून गेली. लोकमतच्या हाती लागलेल्या या गुन्ह्याच्या व्हिडिओतून हा प्रकार पुढे आला.  

नीलेश सिडाम आणि राकेश तिवारी अशी नावे असलेले हे भामटे आठवा मैल वाडी परिसरात राहतात. ते आणि त्यांचा एक साथीदार रविवारी रात्री १० च्या सुमारास वाडीतील मुख्य मार्गावर असलेल्या पेट्रोलपंपावर आले. एक जण बाजूलाच थांबला तर दोघांपैकी एकाने भलामोठा चाकू काढला. तो पाहून पेट्रोलपंपावरील कर्मचारी इकडे-तिकडे पळाले. दुसऱ्याने पंपाच्या मशीनचा पाईप हातात घेऊन स्वत:च स्वत:च्या दुचाकीत पेट्रोल घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला लॉक काढणे जमले नसावे. त्यामुळे ते राहून गेले. दुसरा भामटा चाकू घेऊन पैशाची बॅग सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याकडे गेला. प्रसंगावधान राखत तो कर्मचारी दूर निघून गेल्याने तेसुद्धा टळले. एक जण कॅबिनमध्ये आला.

विशेष म्हणजे, हडकुळे दिसणारे गुंड हातात चाकू घेऊन पेट्रोल पंपावर डाव साधण्याच्या तयारीत असताना तेथे अनेक दुचाकीचालक उभे होते. मात्र, गुंडांवर झपटण्याची हिंमत कुणीही दाखवली नाही. पाच ते सातच्या संख्येत असलेल्या पंपावरील कर्मचाऱ्यांनी गुंडांच्या हातातील भलामोठा चाकू पाहून काडीमोडीच्या या गुंडांवर लाथ घालण्याची  हिंमत दाखवली नाही. त्यामुळे ते पंपावर दहशत निर्माण करत राहिले. बराच वेळ झाल्यानंतर आपला डाव येथे साधला जाऊ शकत नाही, हे त्यांच्या ध्यानात आले. त्यामुळे की काय, ते गुंड तेथून निघून गेले. हा संपूर्ण घटनाक्रम पेट्रोल पंपावरच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तो बघता गुंडगिरी वाढल्याची ओरड करणारी मंडळी प्रसंगी कशी गप्पगुमान बसतात त्याचा प्रत्यय येतो. शिवाय बघ्याची भूमिका घेतल्यामुळेच गुंड निर्ढावलेपणा दाखवतात, तेसुद्धा अधोरेखित होते.

अटक अन् जेलपास !पेट्रोलपंपावरून निघाल्यानंतर या गुंडांनी एमआयडीसी परिसरात लुटमारीचे दोन गुन्हे केले. दरम्यान, गुन्ह्याची माहिती कळाल्यानंतर पाठलाग करून पोलिसांनी तीनपैकी नीलेश सिडाम आणि राकेश तिवारी या दोघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यांची पोलीस कस्टडी (पीसीआर) मिळवून त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती मिळवता आली असती. मात्र, प्रभावी बाजू मांडण्यात पोलीस कमकुवत ठरले. त्यामुळे न्यायालयाने पीसीआर ऐवजी त्यांना एमसीआर (न्यायालयीन कस्टडी) देऊन कारागृहात पाठविले.

टॅग्स :DacoityदरोडाnagpurनागपूरPoliceपोलिसArrestअटकPetrol Pumpपेट्रोल पंप