शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
5
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
7
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
8
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
9
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
10
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
11
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
12
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
13
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
14
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
15
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
16
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
17
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
18
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
19
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
20
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?

धक्कादायक! धावत्या सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये गोळीबार, फायरिंग करणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 16:49 IST

एका प्रवाशाने अचानक रिवॉल्व्हर काढून गोळीबार सुरू केला

Sealdah Rajdhani Express firing: सियालदह राजधानी एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाने गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही भयावह घटना गुरुवार घडल्याचे सांगितले जात आहे. गोळीबारानंतर त्या व्यक्तीला ट्रेनमधून उतरवून अटक करण्यात आल्याचेही स्पष्ट केले गेले आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. गोळीबाराच्या वेळी ती व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होती का?, याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

ही घटना एका वकिलाने त्याच्या डोळ्यासमोर घडल्याचे सांगितले. स्वतःच्या डोळ्यांनी ही घटना पाहताना त्यांनाही धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले. घटनेच्या वेळी सियालदह राजधानी एक्स्प्रेसमधील एका वकिलाने सांगितले की, अचानक घडलेल्या या घटनेनंतर प्रवासी बराच वेळ घाबरले होते. संपूर्ण ट्रेनचा कसून शोध घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाल्याने बराच काळ वातावरण तणावपूर्ण होते.

जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्येही घटना होती गोळीबाराची घटना

असाच एक प्रकार जुलै महिन्यातही समोर आला होता. पालघर स्थानकाजवळ जयपूर मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती. 31 जुलै रोजी, माजी रेल्वे सुरक्षा दलाचे कॉन्स्टेबल चेतन सिंह चौधरी यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी टिकाराम मीना आणि ट्रेनमध्ये प्रवास करणार्‍या इतर तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केल्याचा प्रकार घडला होता.

खून व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला

या घटनेतील गोळीबार करणारा चौधरी याला गुन्ह्यात वापरलेल्या शस्त्रासह अटक करण्यात आली असून त्याच्यावर खून व अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याशिवाय धर्माच्या आधारे गटांमध्ये शत्रुत्व भडकवण्याचे कलमही चौधरीवर लावण्यात आले होते.

टॅग्स :FiringगोळीबारRajdhani Expressराजधानी एक्स्प्रेसrailwayरेल्वेArrestअटक