शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सचिन वाझे प्रकरणात स्कॉर्पिओ, इनोव्हा पाठोपाठ मर्सिडीज कार NIA केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 21:24 IST

Sachin Vaze : मनसुख हिरेन हे गायब होण्याआधी त्यांनी या कारने प्रवास केल्याचं तपासात उघड झालं आहे. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणात मोठा खुलासा हिऱ्यांची शक्यता नाकारता येत नाही. 

ठळक मुद्देएनआयएच्या चौकशीत तिसर्‍या कारचीही चौकशी सुरू झाली होती. ती कार म्हणजे मर्सिडीज, ती कार NIA ने जप्त केली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात दररोज नवीन खुलासे उघड होत आहेत. २५ फेब्रुवारी रोजी रात्री मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ सापडली. स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या वीस कांड्या होत्या. या भागातील सीसीटीव्हीची पुनर्बांधणी करण्यात आली तेव्हा दोन वाहनांची संशयास्पद हालचाल त्या सीसीटीव्हीत सापडली, त्यातील पहिली स्कॉर्पिओ आणि दुसरी इनोव्हा कारची होती. मात्र, एनआयएच्या चौकशीत तिसर्‍या कारचीही चौकशी सुरू झाली होती. ती कार म्हणजे मर्सिडीज, ती कार NIA ने जप्त केली आहे. मनसुख हिरेन हे गायब होण्याआधी त्यांनी या कारने प्रवास केल्याचं तपासात उघड झालं आहे. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणात मोठा खुलासा हिऱ्यांची शक्यता नाकारता येत नाही.  

डिक्कीची पाहणी 

मनसुख हिरेन यांनी शेवटचा प्रवास केलेली मर्सिडीज कार एनआयएनं जप्त केली आहे. या कारच्या डिक्कीची पाहणी एनआयएच्या तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. एनआयएचे सात ते आठ अधिकारी या मर्सिडीज कारच्या डिक्कीची पाहणी करत होते.

मर्सिडीज शोधात होतं तपास पथक

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओच्या चौकशीत मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणातील एनआयएची चौकशी जसजशी सुरू आहे तसतशा नवीन गोष्टीही समोर येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन वाझे प्रकरणातील इनोव्हा कारची माहिती मिळाल्यानंतर एनआयए आता मर्सिडीज कारचीही चौकशी शोध घेत होती. असे म्हटले जात आहे की, ही मर्सिडीज कारही तपासणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.एनआयएने घेतलेले सीसीटीव्ही फुटेज

एनआयएला मर्सिडीज कारचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर असल्याचे समजते. या मर्सिडीजमध्ये स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन बसले होते. सीसीटीव्हीतून मनसुख कुणाची तरी वाट पहात होते. तेवढ्यात एक मर्सिडीज कार आली आणि मनसुख त्यात बसून निघून गेले असे दिसून येत आहे. मनसुख बेपत्ता झाल्यावर हा सीसीटीव्ही असू शकतो असा एनआयएचा संशय आहे.मर्सिडीज मिळाली आता मोठा खुलासा होईल 

मनसुख हिरेन त्या दिवशी कोणाबरोबर गेले होते? ती गाडी कोणाची होती? एनआयए आता या सर्व बाबींचा तपास करत आहे. मर्सिडीज सापडल्यानंतर मनसुख हिरेन प्रकरणात इतर कोणते लोक सामील आहेत? हे देखील कळेल. या प्रकरणात बऱ्याच मोठ्या व्यक्ती गुंतलेल्या असल्याची चर्चा राजकीय मंडळी करत आहेत. अशा परिस्थितीत मर्सिडीजच्या शोधानंतर आणखी महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता आहेत.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाMansukh Hirenमनसुख हिरणcarकार