शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

नागपुरात स्कूलबसने विद्यार्थ्याला चिरडले : प्रचंड तणाव, परिसरात तीव्र शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 21:05 IST

बसमधून विद्यार्थी खाली उतरल्यानंतर तो सुरक्षित अंतरावर गेला की नाही, याची शहानिशा न करताच चालकाने निष्काळजीपणे बस दामटल्याने बसखाली येऊन एक विद्यार्थी चिरडला गेला.

ठळक मुद्देबजेरियात भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बसमधून विद्यार्थी खाली उतरल्यानंतर तो सुरक्षित अंतरावर गेला की नाही, याची शहानिशा न करताच चालकाने निष्काळजीपणे बस दामटल्याने बसखाली येऊन एक विद्यार्थी चिरडला गेला. यश मेवालालजी मिश्रा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजेरिया चौकाजवळ शुक्रवारी दुपारी हा भीषण अपघात घडला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

आठ वर्षांचा यश बजेरियातील तेलीपुऱ्यात राहत होता. मोहननगरातील सेंटर पॉईंट हायस्कूलच्या तिसऱ्या वर्गात यश शिकत होता. नेहमीप्रमाणे आज सकाळी तो शाळेत गेला. दुपारी ३. ३० ते ३. ४५ च्या सुमारास यश त्याच्या स्कूल बसमध्ये (एमएच ४० / बीएल ३६२०) मध्ये बसून घराकडे निघाला. विना वाहकाची ही बस बजेरिया चौकातील एका मेडिकल स्टोर्ससमोर चालकाने थांबवली. यश बसमधून खाली उतरला. तो बसपासून सुरक्षित अंतरावर गेला की नाही, त्याची कोणतीही बसचालकाने शहानिशा न करता आरोपी चालक प्रफुल्ल मथुरे (वय २६, रा. नारा) याने बस पुढे दामटली. त्यामुळे चिमुकला यश बसच्या चाकात आला आणि चिरडला गेला. ते पाहून बाजूची महिला जोरात ओरडली. तिचा आरडाओरड ऐकून परिसरातील मंडळी धावली. चालकाने काही अंतरावर बस उभी केली. त्यानंतर अत्यवस्थ अवस्थेतील यशला मेयोत नेण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघाताने घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच गणेशपेठ पोलीस तेथे पोहचले. वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित आणि अन्य पोलीस अधिकारीही पोहचले. जमावाकडून बसवर दगडफेक किंवा जाळपोळीचा प्रकार घडू शकतो, हे ध्यानात घेत पोलिसांनी तेथून बस हटविली.

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थीDeathमृत्यू