कर्जाला कंटाळून स्कूल व्हॅन चालकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये सांगितले कारण

By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 27, 2023 11:55 IST2023-09-27T11:55:30+5:302023-09-27T11:55:33+5:30

वाशी सेक्टर 28 येथील उद्यानात हा प्रकार घडला आहे.

School van driver commits suicide over debt; The reason stated in the suicide note | कर्जाला कंटाळून स्कूल व्हॅन चालकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये सांगितले कारण

कर्जाला कंटाळून स्कूल व्हॅन चालकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये सांगितले कारण

नवी मुंबई : कर्जाला कंटाळून स्कुल व्हॅन चालकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. शरद खराडे (45) असे त्यांचे नाव असून ते कोपर खैरणेत रहायला होते. वाशी येथील उद्यानात त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली.

वाशी सेक्टर 28 येथील उद्यानात हा प्रकार घडला आहे. कोपर खैरने सेक्टर 8 येथे राहणारे स्कुल व्हॅन चालक शरद खराडे यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. अंग झडतीमध्ये चिठ्ठी आढळून आली असून कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या परिचयाच्या स्कुलव्हॅन चालकांनी हळहळ व्यक्त करत घटनास्थळी धाव घेतली. खराडे हे काही महिन्यांपासून आर्थिक संकटाला सामोरे जात होते. यात त्यांना नैराश्य आल्याने त्यांनी अखेर आत्महत्या केली.

Web Title: School van driver commits suicide over debt; The reason stated in the suicide note