शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत नोकरी मिळविण्यासाठी त्याने दिला शाळेचा बनावट दाखला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 21:10 IST

सध्या हा आरोपी न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत आहेत. 

ठळक मुद्दे३१ वर्षानंतर वैद्यला मुकादम या पदासाठी पदोन्नती आली. कागदपत्र पडताळणीत वैद्यनं जमा केलेला शाळेचा दाखला हा खोटा असल्याचं निदर्शनास आलं.  कस्तुरबा रुग्णालयाचे अधिष्ठाता चंद्रकात पवार यांनी खोटी कागदपत्रे सादर करून पालिकेची नोकरी मिळवल्याप्रकरणी वैद्य विरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. 

मुंबई - आग्रीपाडा पोलिसांनी पालिकेच्या एका ५६ वर्षीय कर्मचाऱ्याला अटक केली आहे. बिजेंद्रसिंग वैद्य असं या आरोपीचं नाव आहे. बनावट शाळेचा दाखला देत पालिकेची नोकरी मिळवल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सध्या हा आरोपी न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत आहेत. 

उत्तरप्रदेशचा राहणारा बिजेंद्र वैद्य मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचारी पदासाठी १९८४ मध्ये अर्ज केला होता. त्यानुसार वैद्यला पालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कंत्राटी स्वरूपात नोकरीवर ठेवण्यात आले होते. १९८८ मध्ये वैद्यला पालिकेच्या सेवेत दाखल करून घेण्यात आलं. दरम्यान, सध्या वैद्य हा पालिकेच्या भायखळा येथील कस्तुरबा रुग्णालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत होता.

३१ वर्षानंतर वैद्यला मुकादम या पदासाठी पदोन्नती आली. मात्र, पदोन्नती पूर्वी संबधित कर्मचाऱ्याच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यानुसार वैद्यची कागदपत्रे पडताळणीसाठी पाठवण्यात आली होती. कागदपत्र पडताळणीत वैद्यनं जमा केलेला शाळेचा दाखला हा खोटा असल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार कस्तुरबा रुग्णालयाचे अधिष्ठाता चंद्रकात पवार यांनी खोटी कागदपत्रे सादर करून पालिकेची नोकरी मिळवल्याप्रकरणी वैद्य विरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. कस्तुरबा रुग्णालयाचे अधिष्ठाता चंद्रकात पवार यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्ह्याचा सखल तपास करून १२ फेब्रुवारी रोजी वैद्यवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. न्यायालयानं त्याला १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. रविवारी वैद्यला पोलिसांनी सुट्टीच्या न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :ArrestअटकSchoolशाळाPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल