शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 18:02 IST

बंगळुरू येथील महालक्ष्मी हत्याकांडात दिवसेंदिवस नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत.

बंगळुरू येथील महालक्ष्मी हत्याकांडात दिवसेंदिवस नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. आता आरोपी मुक्ती रंजनचा भाऊ सत्यरंजन याने दैनिक भास्करशी संवाद साधला असून त्यात त्याने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. सत्यरंजनने महालक्ष्मीवर आपला भाऊ मुक्ती रंजनचा छळ केल्याचा आरोपही केला आहे.

सत्यरंजन म्हणाला, "एक दिवस माझा भाऊ मुक्ती रंजनने मला फोन केला, संभाषणादरम्यान तो खूपच अस्वस्थ वाटत होता. खूप विचारणा केल्यावर त्याने सांगितलं की, महालक्ष्मी त्याला ब्लॅकमेल करत होती. महालक्ष्मीने त्याच्याकडून सात लाख रुपये आणि सोन्याची चेन घेतली. हा प्रकार घरच्यांना कळताच ते प्रचंड संतापले. कुटुंबीयांनी मुक्ती रंजनला विचारलं की, जर तू त्या मुलीला (महालक्ष्मी) सर्व दिलंस तर आम्ही काय करणार आणि कुठे जाणार?"

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी मुक्ती रंजनचा भाऊ सत्यरंजनच्या बोलण्यावरून असं सूचित होतं की, तो महालक्ष्मीच्या हत्येच्या एक दिवस आधी घरी आला होता. मुक्ती रंजनच्या आईनेही तो घरी आल्याचं सांगितलं आहे. मुक्ती रंजनची आई म्हणाली, "तीन मुलांमध्ये मुक्ती रंजन सर्वात लहान होता आणि तो दोन वर्षांनी घरी आला. रात्री दहा वाजता घरी आलेला मुक्ती रंजन खूप अस्वस्थ होता. घरी आल्यावर त्याने चहा करायला सांगितला आणि नंतर जेवला. पहाटे चारपर्यंत घरात राहिल्यानंतर तो लॅपटॉप, अंगठी, चेन घेऊन घराबाहेर पडला."

मुक्ती रंजनचा भाऊ सत्यरंजनने सांगितलं की, "हत्येपूर्वी मुक्ती रंजन माझ्याकडे आला आणि म्हणाला की, तो खूप त्रस्त आहे, त्याला भीती होती की, तो मोठा गुन्हा करेल. एकदा मुक्ती रंजन केरळला जात असताना रस्त्यात बाईक थांबवून महालक्ष्मीमुळे त्याला मारहाण झाली होती. लोकांनी त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी एक हजार रुपये घेऊन सोडून दिलं." 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूर