शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Satish Kaushik Death : दाऊदच्या मुलानेही दुबईच्या पार्टीला हजेरी लावली; सतीश कौशिकच्या मित्राच्या पत्नीचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 17:44 IST

Satish Kaushik Death : बॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Satish Kaushik Death :  बॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पण आज या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गुरुग्राममधील फार्महाऊसचा मालक विकास मालू, जिथे सतीश कौशिक मृत्यूपूर्वी पार्टी करत होते, ते सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

विकास मालूवर ही शंका त्यांच्या पत्नीने उपस्थित केली आहे. दिल्ली पोलीस विकास मालूच्या पत्नीचे जबाब नोंदवून या प्रकरणाचा पुढील तपास करणार आहेत. पण दरम्यान, या प्रकरणात आणखी एका महत्त्वाच्या दावा केला जात आहे. सतीश कौशिक यांच्या गूढ मृत्यूमागे आपल्या पतीचा हात असावा, अशी शंका देत विकास मालूच्या पत्नीने दिल्ली पोलिसांना पत्र लिहिले होते. यासोबतच कुबेर ग्रुपचे मालक विकास यांच्या पत्नीनेही दुबईतील एका पार्टीचा उल्लेख पोलिसांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

१५ कोटीच्या वादातून सतीश कौशिक यांची हत्या?; महिलेचा खळबळजनक दावा, संपूर्ण घटना सांगितली

'२३ ऑगस्ट २०२२ रोजी तिचा बिझनेसमन पती विकास मालू यांनी दुबईमध्ये पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत अभिनेता सतीश कौशिकही उपस्थित होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगा अनस हाही या पार्टीत उपस्थित असल्याचे विकासने सांगितले होते, असं विकास मालूच्या पत्नीने पोलिसांना सांगितले आहे.  या पार्टीपूर्वी सतीश कौशिक हे विकास मालूच्या घरी गेले होते, यावेळी १५ कोटी रुपयांवरून वाद झाला होता, असा दावाही त्यांनी केला आहे. 

आता या प्रकरणात एका महिलेच्या दाव्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.महिलेने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली असून त्यात सतीश कौशिक यांचा खून झाल्याचा दावा केला आहे. ही महिला दुसरी कोणी नसून सतीश कौशिक यांची मैत्रीण आणि व्यापारी विकास मालू यांची पत्नी आहे.

१५ कोटींच्या वादातून तिच्या पतीने सतीश कौशिकची हत्या केल्याचा महिलेचा दावा आहे. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी तिच्या पतीने सतीश कौशिक यांच्याकडून १५ कोटी रुपये घेतले होते. मात्र पतीकडे देण्यासाठी पैसे नसल्याने या वादातून त्याने ही हत्या केली.

टॅग्स :Satish Kaushikसतीश कौशिकbollywoodबॉलिवूड