शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

धमक्या मिळाल्या, पण सत्य सोडलं नाही; महिला कॉन्स्टेबलने ९ पोलिसांना मिळवून दिली फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:14 IST

बाप-लेकाच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी ९ पोलिसांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात महिला कॉन्स्टेबलची साक्ष महत्त्वाची ठरली.

Tamil Nadu Custodial Death: तमिळनाडूतील सथानकुलम येथे बाप-लेकाचा पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष हत्येने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या प्रकरणात तब्बल ६ वर्षांनंतर न्याय मिळाला असून, मदुराई न्यायालयाने ९ दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत एका महिला हेड कॉन्स्टेबल रेवती यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.  स्वतः पोलीस दलात असूनही आपल्याच सहकाऱ्यांविरुद्ध उभे राहून त्यांनी दिलेली साक्ष या खटल्यात निर्णायक ठरली.

जून २०२० मध्ये, जेव्हा जग कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडकले होते, तेव्हा थूथुकुडी जिल्ह्यातील सथानकुलम पोलीस स्टेशनमध्ये ही हादरवणारी घटना घडली होती. पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांनी मोबाईलचे दुकान ठरलेल्या वेळेपेक्षा थोडा वेळ जास्त उघडी ठेवले म्हणून ताब्यात घेण्यात आलं होतं.

कोठडीत अमानुष अत्याचार; रेवतीचा  जबाब

कॉन्स्टेबल रेवतीने न्यायालयात दिलेली साक्ष अंगावर काटा आणणारी आहे. तिने सांगितले की, "मी रात्री ८:५० च्या सुमारास पोलीस स्टेशनवर पोहोचले, तेव्हा आतून अम्मा, खूप दुखतंय, प्लीज मला सोडून द्या असे ओरडण्याचे आवाज येत होते. पोलीस कर्मचारी जयराज आणि बेनिक्स यांना विवस्त्र करून बेदम मारहाण करत होते. त्यांच्या गुप्तांगावर बुटांनी वार केले जात होते. अमानुषतेचा कळस म्हणजे, पोलीस मध्येच दारू पिण्यासाठी थांबायचे आणि पुन्हा मारहाण सुरू करायचे." जेव्हा रेवतीने जखमी जयराज यांना कॉफी देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इतर पोलिसांनी ती हिसकावून फेकून दिली.

जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू झाला, तेव्हा पोलीस विभागात हे प्रकरण दाबण्याचे मोठे प्रयत्न झाले. ९ पोलीस अधिकारी आरोपी होते. अशा वेळी रेवतीने न्यायमूर्तींना सांगितले, "सर, मी सत्य सांगायला तयार आहे, पण मला माझ्या दोन मुलींच्या आणि नोकरीच्या सुरक्षिततेची हमी हवी आहे."

साक्ष नोंदवताना बाहेर जमा झालेले पोलीस कर्मचारी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना धमकावत होते आणि रेवतीवर शेरेबाजी करत होते. मात्र, कडक पोलीस बंदोबस्तात रेवतीने आपला जबाब नोंदवला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने प्रत्येक आरोपीची ओळख पटवून दिली.

सर्वोच्च न्यायालयाची चपराक

या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयानेही कडक भूमिका घेतली आहे. "पोलीस कोठडीतील मृत्यू हा व्यवस्थेवरील मोठा डाग आहे आणि देश आता हे सहन करणार नाही," असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याबाबत राज्यांच्या दिरंगाईवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman Constable's Testimony Leads to Death Sentence for Nine Cops

Web Summary : A Tamil Nadu custodial death case saw justice after six years. Constable Revathi's brave testimony against her colleagues, detailing brutal torture and murder, proved crucial in sentencing nine police officers to death, despite threats and pressure.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTamilnaduतामिळनाडूPoliceपोलिस