शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा नाही, सातारा कोर्टाने सुनावली ४ दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 14:46 IST

Gunratna sadavarte : खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य सदावर्ते यांनी केले होते.

सातारा : सातारा पोलीस ठाण्याने आज अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते रिमांडसाठी सातारा जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य सदावर्ते यांनी केले होते.

दीड वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या गुन्ह्यात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकार पक्ष आणि बचाव पक्षाच्या वतीने जोरदार युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही बाजुंचे म्हणणे झाल्यानंतर न्यायालयाने अ‍ॅड. सदावर्तेना दि. १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दीड वर्षापूर्वी एका वाहिनीवरती अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी खासदार उदयनराजे आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी सदावर्ते यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. मात्र, त्यांना अटक झालेली नव्हती. आठ दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटीच्या कर्मचाºयांनी हल्ला केला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यावेळी सातारा पोलीस शहर ठाण्यातील गुन्ह्यात अ‍ॅड. सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. पण, अ‍ॅड. सदावर्ते यांना पोलीस कोठडी मिळाली होती. त्यामुळे पोलिसांना दोन दिवस थांबावे लागले. त्यानंतर अ‍ॅड. गुणरत्ने यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सातारा पोलिसांनी जिल्ह्यातील गुन्ह्याची माहिती न्यायालयासमोर मांडली. न्यायालयाच्या आदेशाने गुरुवारी सकाळी सातारा पोलिसांनी अ‍ॅड. सदावर्ते यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास त्यांना सातारा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व कोठडीत ठेवण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जिल्हा न्यायालयात नेण्यात आले. याठिकाणी सहावे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांच्यासमोर सरकार पक्ष, फिर्यादीचे वकील आणि बचाव पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. त्यांनतर न्यायालयाने अ‍ॅड. सदावर्ते यांना चार दिवस, दि. १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

वकील गुणरत्न सदावर्ते सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांना चौकशीसाठी काल सातारा पोलीस स्टेशनला आणले. मुंबईतील आर्थर रोड जेलमधून सकाळी सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेत सातारा शहर पोलीस ठाण्यात काल दाखल करण्यात आले. त्यावेळी भारतमाता की जय अशा घोषणा गुणरत्न सदावर्ते यांनी दिल्या. दरम्यान शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजी राजे भोसले यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटण तालुक्यातील कोंजवडे येथील राजेश निकम यांनी ही तक्रार दाखल केली.

टॅग्स :Courtन्यायालयSatara areaसातारा परिसरPoliceपोलिसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले