शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

सासवडचे भूमिअभिलेख कार्यालय फोडले, महत्त्वाची कागदपत्रे गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 02:20 IST

सासवड येथील भूमिअभिलेख कार्यालयात मंगळवार, दि. १९ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाच्या दरवाजाची कुलपे तोडून केली चोरी

सासवड : येथील भूमिअभिलेख कार्यालयात मंगळवार, दि. १९ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाच्या दरवाजाची कुलपे तोडून कार्यालयातील कपाटे, टेबलचे ड्रॉवर यांची उचकापाचक केली असल्याचा प्रकार घडला असून, भूमिअभिलेख कार्यालयाचे परीक्षण भूमापक शाम माणिक ताथवडकर (रा. सासवड) यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड येथील भूमिअभिलेख कार्यालयाचे शिपाई रोहित टपळे यांच्या दुसऱ्या दिवशी २० मार्चला सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी परीक्षण भूमापक शाम ताथवडकर यांना फोनवर सर्व प्रकार सांगितला. ताथवडकर कार्यालयात आले असता कार्यालयाचा मुख्य दरवाजा, मुख्य गेट, कार्यालयातील सर्व दरवाजांची कुलपे, कार्यालय प्रमुखांचे कक्षाचा दरवाजा व टेबलचे ड्रॉवर तोडलेले निदर्शनास आले. विशेष म्हणजे कार्यालयातील प्रत्येक रूममधील लोखंडी कपाटे, दरवाजे तोडलेले असल्यामुळे चोरट्यांनी पैसे चोरण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. येथील भूमिअभिलेख कार्यालयात अज्ञातांनी केलेल्या तोडफोडीमागे पुरंदर तालुक्यातील जमीन खरेदी-विक्री एजंट अथवा बनावट आणि फसवणुकीचे व्यवहार करणाऱ्या टोळीचा तर हात नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. कारण पुरंदर तालुक्यात येऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चर्चेमुळे जमिनी खरेदी-विक्रीतील फसवणुकीच्या प्रकरणांना उधाण आले आहे आणि यामध्ये पुरंदरच्या महसुली अधिकारी आणि कर्मचारी यांचे या एजंटांसोबत आर्थिक हितसंबंध असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.सासवड येथील भूमिअभिलेखच्या कार्यालय फोडण्याचा परवा रात्री घडलेल्या प्रकारामागचे कारण अद्याप समजू शकले नाही परंतु प्रथमदर्शनी हा पैशाच्या हेतूने चोरीचा प्रकार नसून यामागे कार्यालयातील कागदपत्रे अथवा अन्य दस्तावेज चोरण्याच्या हेतूने अज्ञातांनी कार्यालयाची तोडफोड केली आहे.- अण्णासाहेब घोलपपोलीस निरीक्षक सासवडसीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षकही नाही...सासवड येथील भूमिअभिलेख कार्यालयात संपूर्ण पुरंदर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची जुनी आणि नवीन महसुली कागदपत्रे, दस्तावेज असतात. या कागदपत्रांची सुरक्षितता अत्यंत आवश्यक असताना भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात सीसीटीव्ही बसविण्यास केलेल्या दिरंगाईमुळे आता कार्यालयाच्या तोडफोडीतील आरोपींची ओळख पटणे कठीण झाले आहे. तसेच भूमिअभिलेखच्या कार्यालयात कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नियुक्त का केला जात नाही, की अधिकाºयांना कागदपत्रांचे काही महत्त्वच राहिलेले नाही?

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे