शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 07:35 IST

१०३९ कोटी रुपयांच्या पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने राऊत यांना १ ऑगस्ट रोजी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी वेळेअभावी तहकूब  करून पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे. 

१०३९ कोटी रुपयांच्या पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने राऊत यांना १ ऑगस्ट रोजी अटक केली. या गैरव्यवहारात राऊत यांची मुख्य भूमिका असल्याचा आरोप ईडीने केला आहे. केवळ राजकीय वैमनस्यातून आपल्याला या प्रकरणात नाहक गोवण्यात आले आहे, असे राऊत यांनी जामीन अर्जात म्हटले आहे. राऊत यांच्यातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला असून, ईडीतर्फे युक्तिवाद बाकी आहे. मात्र, वेळेअभावी सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. 

 ‘नवीन चिन्ह पक्षात  क्रांती घडवून आणेल’ निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्य बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवल्यासंदर्भात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, नवीन चिन्ह पक्षात क्रांती घडवून आणेल. राजकीय पक्षाच्या आयुष्यात चिन्ह गोठवण्याच्या घटना घडतात. काँग्रेसबाबत हे तीनदा घडले. इंदिरा गांधी असतानाही हे घडले होते. जनता पक्षालाही या घटनेस सामोरे जावे लागले होते. नवीन चिन्ह कदाचित पक्षात क्रांती घडवून आणेल. पक्षाचे नाव, चिन्ह बदलेल, पण पक्ष तोच राहील, असे राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत