शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पांडे यांच्या डीजीपी पदाचे भवितव्य मंगळवारी ठरणार; यूपीएससी समितीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 11:29 IST

सीबीआयचे संचालक असलेल्या सुबोध जयसवाल यांनी  महाराष्ट्र पोलीसप्रमुखपद सोडल्यानंतर आठ महिन्यांनी ही बैठक होत आहे. दरम्यानच्या कालावधीत राज्य पोलीस दलात उलथापालथ होऊन तिघांकडे प्रभारी पद सोपविण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  गेल्या साडेचार महिन्यांपासून महाराष्ट्र पोलीस दलाची धुरा सांभाळणाऱ्या संजय पांडे यांचे पोलीस महासंचालक-पदाबाबतचे भवितव्य येत्या मंगळवारी (दि.३१) निश्चित होणार आहे.  महाराष्ट्र  डीजीपीसाठी नावे निश्चित करण्यासाठी  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) निवड समितीची या दिवशी  दिल्लीत बैठक होणार आहे. तीन जणांच्या यादीत त्यांची निवड झाल्यास पूर्णवेळ महासंचालकपदासाठीचा त्यांचा मार्ग मोकळा होईल. अन्यथा, मागच्या वेळीप्रमाणे अपात्र ठरविल्यास राज्य सरकारला पुन्हा अन्य अधिकाऱ्यांची निवड करावी लागणार आहे.

  सीबीआयचे संचालक असलेल्या सुबोध जयसवाल यांनी  महाराष्ट्र पोलीसप्रमुखपद सोडल्यानंतर आठ महिन्यांनी ही बैठक होत आहे. दरम्यानच्या कालावधीत राज्य पोलीस दलात उलथापालथ होऊन तिघांकडे प्रभारी पद सोपविण्यात आले आहे. 

 पोलीस महासंचालकपदाच्या निवडीबाबत सर्वोच्च न्यायालयाने प्रकाश सिंग खटल्याचा निकालावेळी काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार या पदासाठी राज्य सरकारकडून  यूपीएससीच्या निवड समितीकडे प्रस्ताव सादर करावयाचा आहे. त्यांनी निश्चित केलेल्या तीन जणांपैकी एकाची निवड राज्य सरकार डीजीपी पदावर करू शकते.  जयसवाल ७ जानेवारीला कार्यमुक्त झाल्यानंतर १७ मार्चपर्यंत हेमंत नगराळे तर ९ एप्रिलपर्यंत रजनीश सेठ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता, तर १० एप्रिलपासून पांडे यांच्याकडे कार्यभार आहे. पूर्णवेळ नियुक्तीसाठी राज्य सरकारने या पदासाठी ३० वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा झालेल्या राज्यात सेवेत असलेल्या १९ जणांची नावे पाठविली आहेत. त्यात अग्रस्थानी संजय पांडे यांचे नाव आहे. नोंदविले होते आक्षेप यूपीएससीच्या निवड समितीने २०१९ मध्ये जयसवाल यांच्या नियुक्तीवेळी  पांडे हे सेवा ज्येष्ठतेनुसार द्वितीय स्थानी होते. मात्र समितीने त्यांच्या ‘एसीआर’बद्दल आक्षेप नोंदवित त्यांच्यानंतरच्या संजय बर्वे व बिपीन बिहारी यांची नावे सुचविली होती.

टॅग्स :Policeपोलिस