शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संदीप देशपांडे यांच्यासह इतर तिघांना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 19:55 IST

प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. 

ठळक मुद्देसंदीप देशपांडे, संतोष धुरी,शशांक नागवेकर आणि संतोष साळी यांना जामीन मंजूरसरकारी कामात अडथळा आणल्याची महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

मुंबई - पालिकेच्या अधिकाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केलेल्या मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह इतर तिघांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. याप्रकरणी कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. काल जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान कोर्टाने संदीप देशपांडे, संतोष धुरी,शशांक नागवेकर आणि संतोष साळी यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. शुक्रवारी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३५३, १४१, १४२, १४३, ५०४, ५०६ नुसार शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी न्यायालयाने संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला होता असून १४ नोव्हेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर न्यायदंडाधिकारी पी. एस. काळे यांनी दिले होते. सरकारी कामात अडथळा आणल्याची महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार संदीप देशपांडे यांना भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं असता कोर्टाने त्यांना 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेCourtन्यायालयMNSमनसेMumbaiमुंबई