अबब! तब्बल वीस लाखांचे चंदन सोलापूरजवळ जप्त!
By रवींद्र देशमुख | Updated: February 20, 2023 18:52 IST2023-02-20T18:51:28+5:302023-02-20T18:52:10+5:30
सोलापूर: मंद्रुप ते कंदलगाव रस्त्यावर चंदन लाकडाची अवैध वाहतुक होत असल्याची माहिती वन विभागास मिळाली. त्या अनुषंगाने घटनास्थळी जावून ...

अबब! तब्बल वीस लाखांचे चंदन सोलापूरजवळ जप्त!
सोलापूर: मंद्रुप ते कंदलगाव रस्त्यावर चंदन लाकडाची अवैध वाहतुक होत असल्याची माहिती वन विभागास मिळाली. त्या अनुषंगाने घटनास्थळी जावून तात्काळ पाहणी केली असता विना नंबर प्लेट वाहनातून चंदन लाकूड वाहतुक करीत असल्याचे आढळून आले. यामध्ये २० लाख रुपये किंमतीचे चंदन व एक नवीन पिकअप वाहन असा एकूण ३० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल वनविभाग जप्त केला असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी दिपक खलाणे यांनी दिली.
मंद्रुप ते कंदलगाव रस्त्यावर चंदन लाकडाची अवैध वाहतुक करताना आरोपी हिराप्पा परशुराम भोसले, परशुराम हुबळी भोसले (रा. दोघे घाडगेवस्ती मु.पो. खर्डी ता. पंढरपूर) रमेश चन्नप्पा भोसले (रा. मंगळवार पेठ, परीट गल्ली, मिरज) यांना ताब्यात घेतले असून. या आरोपींनी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ४२ व ५२ अन्वये तसेच महाराष्ट्र वननियमावली २०१४ चे कलम ३७,४१,४७ व ५५ चे उल्लंघन केलेले आहे. सदर आरोपीवर वन गुन्हा नोंदविला असून, तपास वनपाल शशिकांत एकनाथ सावंत करीत आहेत.