शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! समुद्रपूर शिकार प्रकरण; शेतातील झोपडीत पुरले होते वाघाचे 4 दात आणि 17 नखे

By महेश सायखेडे | Updated: August 17, 2022 19:00 IST

"शेतातील झोपडीत वाघाचे चार दात अन् तब्बल १७ नखे पुरवून ठेवली होती."

वर्धा - समुद्रपूर तालुक्यातील मौजा पवनगाव येथील वाघाच्या शिकारप्रकरणी वनविभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यामधील महालगाव (खुर्द) येथून अविनाश भारत सोयाम (३४) याला अटक केली आहे. सोयाम हा या प्रकरणातील मुख्य आरोपीस आहे. यानेच त्याच्या शेतातील झोपडीत वाघाचे चार दात अन् तब्बल १७ नखे पुरवून ठेवली होती. वाघाचे हे अवयव वनविभागाने गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी धडक कारवाई करून जप्त केले आहेत. 

चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील महागाव (खुर्द) शेत शिवारात तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाहित करून वाघाची शिकार करण्यात आली होती. यानंतर आरोपीने वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच भागातील एका पडीक शेतजमिनीवर वाघाचा मृतदेह नेला. पण यश न आल्याने आरोपीने थेट चंद्रपूर जिल्ह्याची सीमा ओलांडली आणि वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मौजा पवनगाव येथील झुडपी जंगल गाठले. याच ठिकाणी आरोपीने वाघाच्या मृतदेहाचे तुकडे फेकून देत यशस्वी पळ काढला. शिवाय काहीच झाले नाही, असे दर्शवित तो आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झाला होता.

पण नंतर १४ तुकड्यातील वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने वनविभागही ॲक्शन मोडवर आला. तब्बल १४ तुकड्यांत वाघाचा मृतदेह सापडला. पण वाघ नखे आणि दात सापडले नाही. हे लक्षात येताच नक्कीच हा प्रकार शिकारीचा असल्याचा अंदाज वनविभागाकडून बांधण्यात आला. यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत वनविभागाने मुख्य आरोपी अविनाश भारत यास अटक करून वनकोठडी मिळविली. 

वनकोठडीत असलेला आरोपी अविनाश तपासी अधिकाऱ्यांना पाहिजे तसे सहकार्य करीत नसला तरी वनविभागाने पुन्हा आपले सूत्र हलविले. त्यानंतर बुधवारी उपवनसंरक्षक राकेश शेपट यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार यांच्या नेतृत्त्वात समुद्रपूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर, वनपाल विजय धात्रक, वनरक्षक योगेश पाटील, एम. डी. किटे, रमेश चोखे, विजय दिघोळे, सुरेखा तिजारे, शरद ओरके, अविनाश बावणे, अनिल जुमडे, रितेश भानुसे यांनी चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील महालगाव (खुर्द) गाठून वाघाची चार दात व १७ नखे जप्त केली.

वाघाच्या अवयवांची कुणाला होणार होती विक्री?आरोपी अविनाश भारत सोयाम याने त्याच्याच महालगाव शिवारातील शेतातील झोपडीत वाघाची चार दात व तब्बल १७ नखे कुणालाही सहज मिळू नये या हेतूने पुरविली होती. ती वनविभागाने जप्त केली असली तरी अविनाश हा वाघाच्या या अवयवांची कुणाला विक्री करणार होता याचा शोध सध्या वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.

आरोपींची संख्या वाढण्याची शक्यतामुख्य आरोपी अविनाश सोयाम याला कुणी कुणी कशी कशी मदत केली याबाबतची गोपनीय माहिती सध्या वनविभागाचे अधिकारी घेत आहेत. अविनाशला सहकार्य करणाऱ्यांचा सुगावा गवसताच या प्रकरणातील सहआरोपींनाही अटक करण्यात येणार असल्याने या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वनविभागातील खात्रीदायक सूत्रांकडून वर्तविली जात आहे.

टॅग्स :Tigerवाघforestजंगलforest departmentवनविभागPoliceपोलिस