शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

Sameer Wankhede : किरण गोसावी म्हणाला, 'मी समीर वानखेडेंना ओळखत नाही पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 6:47 PM

Kiran Gosavi reaction :त्या नंबरवरून कॉल आल्यानंतर मला विचारणा होत की तू असं का केलं आहेस?, त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मी फरार झालेलो नाही. 

ठळक मुद्देव्ही. व्ही सिंग सरांना आम्ही भेटलो त्यानंतर आमची भेट समीर वानखेडे यांच्याशी झाली. 

क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला २ ऑक्टोबरला अटक करण्यात आली आहे. सध्या तो आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानंतर अनेक आरोप - प्रत्यारोप सुरु झाले. आर्यन खानसोबत सेल्फी काढणाऱ्या किरण गोसावी यांचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. गोसावीविरोधात काही फसवणुकीचे गुन्हे आहेत. त्यात ते एनसीबीच्या कार्यालयात काय करत होते? गोसावी यांनी काढलेला तो सेल्फी चांगलाच व्हायरल झाला होता. रविवारी किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने हा आरोप केला की शाहरुख खानकडे गोसावी यांनी २५ कोटींची मागणी केली होती. या आरोपांचे खंडन करत गोसावी यांनी आता उत्तर देत मी समीर वानखेडेंना ओळखत नाही, टीव्हीवर त्यांना पाहिलं होतं. ड्रग्ज पार्टीबाबत माहिती मिळाली होती म्हणून त्यांना संपर्क साधला असं गोसावी यांनी म्हटलं आहे.

Video : नोकरीसाठी समीर वानखेडेंनी धर्म बदलला, ते मुस्लिमच आहेत; मलिकांनी दाखवला कागद

आपल्यावरील आरोपांचे खंडन करत गोसावी यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितले की, मी ६ ऑक्टोबरपर्यंत मुंबईत होतो. ३ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत मला धमकी देणारे अनेक मुंबईतून फोन आले. त्याबाबत मी एनसीबीलाही कल्पना दिली आणि माझ्या वकिलांनाही सांगितलं. असे काही कॉल्स आल्याने मला फोन माझा फोन बंद करावा लागला. ८ ते १० नंबर्सची सखोल माहिती माझ्याकडे आहे. त्या नंबरवरून कॉल आल्यानंतर मला विचारणा होत की तू असं का केलं आहेस?, त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मी फरार झालेलो नाही. 

मी समीर वानखेडेंना ओळखत नाही. मी त्यांना टीव्हीवर पाहिलं आहे. आम्हाला म्हणजे मला आणि मनिष भानुशाली यांना क्रूझ पार्टीबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे आम्ही एनसीबी कार्यालयात गेलो होतो. व्ही. व्ही सिंग सरांना आम्ही भेटलो त्यानंतर आमची भेट समीर वानखेडे यांच्याशी झाली. प्रभाकर साईलबाबत बोलताना गोसावी म्हणाले, प्रभाकरला ओळखतो. ११ ऑक्टोबरपर्यंत तो माझ्याकडे काम करत होता.

तोडपाणीबाबत बोलताना गोसावी यांनी मी पैशांबाबत काही बोलणं केलंच नाही. तो माझ्यावर आरोप करतो आहे त्यात तथ्य नाही. उलट तो मला म्हणत होता तुम्ही मला पंच ठेवल्याबाबत पैसे द्या नाहीतर मी मीडियाला जाऊन त्या सह्यांबाबत सर्व उघड करेन. त्यावर गोसावी त्याला म्हणाले, तुला काय सांगायचे आहे ते सांग. जे काही घडलं त्याप्रकरणी मी कोर्टाची पायरी चढणार आहे.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbaiमुंबई