शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

समीर वानखेडे यांची सलग तीन तासांपासून कोपरी पोलिसांकडून चौकशी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:59 IST

Sameer Wankhede :तीन दिवसांपूर्वी झाला होता गुन्हा दाखल

जितेंद्र कालेकर 

ठाणे: बनावट कागदपत्रे दाखल करीत खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना  मिळविल्याच्या आरोपाखालीएनसीबीचे मुंबई विभागाचे वादग्रस्त माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने  कोपरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा शनिवारी रात्री दाखल केला होता. याच संदर्भात वानखेडे यांना कोपरी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्याच अनुषंगाने बुधवारी सकाळी ११.३० वाजल्यापासून वानखेडे यांची चौकशी करण्यात येत आहे.       

वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन नवी मुंबईतील हॉटेलसाठी परवाना मिळवल्याचा  वानखेडे यांच्यावर आरोप आहे. वयाच्या सतराव्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने  त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. त्यापाठोपाठ ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्यांच्या बारचा परवानाही रद्द केला. कोपरी पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डीसुझा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.  

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वानखेडे यांनी ठाणे पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य  करायचे आहे. त्यामुळेच आमचे आशील यात पोलिसांना सर्व सहकार्य करतील, अशी माहिती वानखेडे यांच्या वकिलांनी दिली. मुळात, हे प्रकरण १९९७ चे आहे. त्यावेळी वानखेडे यांचे वय हे कमी असले तरी आता त्यांच्या अटकेची आवश्यकता नसल्याचेही वकिलांनी म्हटले आहे.

दरम्यान, वानखेडे यांना ठाणे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर  बुधवारी पहाटेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनाही अमलबजावणी संचालनालयाने  (ईडी) चौकशीसाठी बोलविल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेthaneठाणेPoliceपोलिस