शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

सलमान खानच्या चित्रपटाचं तिकिट काढून दिलं नाही, आरोपीनं एकाच्या पोटात खुपसला चाकू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 15:27 IST

Stabbing Case : पोलिसांनी आरोपी सय्यद झियाउद्दीनला घटनास्थळावरून अटक केली आहे. त्याच्याकडून पीडितेची पर्स आणि रक्ताने माखलेला चाकू जप्त केला.

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या 'अंतिम' या चित्रपटाचे तिकीट खरेदी करण्यास नकार दिल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकूने वार करून जखमी केले. ही घटना दिल्लीच्या मध्य जिल्ह्यातील चांदनी महल पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पोलिसांनी आरोपी सय्यद झियाउद्दीनला घटनास्थळावरून अटक केली आहे. त्याच्याकडून पीडितेची पर्स आणि रक्ताने माखलेला चाकू जप्त केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण डिलाईट सिनेमा हॉलमध्ये सलमान खानचा 'अंतिम' सिनेमा पाहण्यासाठी आला होता. त्यानंतर सय्यद जियाउद्दीनही तेथे पोहोचला आणि त्याने त्या तरुणाला सांगितले की, त्याच्यासाठीही तिकीट काढ. त्याने तिकीट खरेदी करण्यास नकार देताच आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याची पर्स हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला.ही खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास घडली. अजय नावाचा तरुण सलमान खानचा 'अंतिम' सिनेमा पाहण्यासाठी डिलाइट सिनेमा हॉलमध्ये पोहोचला होता. त्यानंतर सय्यद झियाउद्दीन अजयकडे पोहोचला. सय्यद झियाउद्दीनने सिनेमा हॉलच्या बाहेर असलेल्या अजयला त्याच्यासाठीही सिनेमाचं तिकीट खरेदी करायला सांगितलं.यानंतर अजयने त्याच्यासाठी तिकीट घेण्यास नकार दिला. यानंतर सय्यदने अजयच्या कमरेवर चाकूने वार करून त्याची पर्स लंपास केली आणि त्याच्या पाठलाग केल्यास पोटात वार कारेन, अशी धमकी दिली. नंतर आरोपीने पळ काढला. तेव्हा आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी चोर-चोर म्हणत आरडाओरडा सुरू केला.

त्याचवेळी दिल्ली पोलिसांचा एक जवान गस्त घालत असताना त्या भागात पोहोचला आणि आवाज ऐकून तोही चोराच्या मागे धावला आणि त्याला जागीच पकडले. सय्यद जियाउद्दीनकडून लुटलेली अजयची पर्स आणि सय्यदने अजयवर हल्ला केलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांचे म्हणणे आहे की, तपासात सय्यद जियाउद्दीन हा गुंड असल्याचे आढळून आले असून त्याच्यावर दरोडा आणि सोनसाखळी चोरीचे सुमारे २६ गुन्हे दाखल आहेत. ५ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वी तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिसSalman Khanसलमान खानArrestअटक