शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 10:04 IST

Salman Khan : सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला येणाऱ्या धमक्यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यावेळी थेट सलमान खानला कॉल केला नाही, तर मु़ंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला हा धमकीचा मेसेज आला आहे. या धमकीत देखील लारेन्स बिश्नोईचं नाव समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला. धमकी देणाऱ्याने गँगस्ट लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीवजा मेसेज केला आहे. या मेसेजमध्ये मी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ बोलत असल्याचा दावा त्याने केला आहे. तसेच, सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, नाहीतर पाच कोटी रुपये द्यावे. नाही दिल्यास आम्ही त्याला जीवे मारू. आमची गँग आजही सक्रिय आहे, असे म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान, अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे.  १९९८ मध्ये काळविटाची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर आहे. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो, यामुळे लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. १४ एप्रिल रोजी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर देखील गोळीबार झाला होता. यानंतर दसऱ्याच्या दिवशी सलमान खानच्या जवळचे असलेले बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. या दोन्ही घटनांमागे बिश्नोई टोळीचा हात असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी देशभरातून काही आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Salman Khanसलमान खानCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई