शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निराधार महिलेची मध्यप्रदेशात विक्री, तक्रार मिळताच पोलिसांनी २४ तासात लावला छडा, खरेदीदारासह चौघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 23:21 IST

Crime News : पीडित महिला २४ वर्षांची आहे तिला चार वर्षाचा मुलगा असून ती अजनीत राहते. तिच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती निराधार झाली होती. स्वतः आणि मुलाचे भरण-पोषण करण्यासाठी ती मिळेल ते काम करत होती.

नागपूर : पतीच्या मृत्यूनंतर निराधार झालेल्या महिलेला दोन महिलांसह तिघांनी फूस लावून पळवून नेले. तिची मध्यप्रदेशात एका व्यक्तीला पावणे दोन लाखात विक्री केली. या घटनेची तक्रार मिळताच बेलतरोडी पोलिसांनी तत्परता दाखवून अवघ्या २४ तासात आरोपींना पकडले आणि पीडित महिलेला तिच्या आईच्या हवाली केले. (Sale of  woman in Madhya Pradesh, Police nab four in 24 hours after receiving complaint) पीडित महिला २४ वर्षांची आहे तिला चार वर्षाचा मुलगा असून ती अजनीत राहते. तिच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती निराधार झाली होती. स्वतः आणि मुलाचे भरण-पोषण करण्यासाठी ती मिळेल ते काम करत होती. कधी केटरर्सच्या कामालाही जायची. आरोपी कुणाल अरुण ढेपे (वय ३७, रा. गणेश नगर कोतवाली), विभा मनोज वर्धेकर (वय ४०, रा महाकाली नगर) आणि मुस्कान मोहब्बुदिन शेख (वय ३१, न्यू फुटाळा वस्ती) यांच्याशी तिची ओळख होती. त्यांच्यासोबत एक दोनदा ती बाहेरही गेली होती. ती अधूनमधून आईकडेसुद्धा यायची. १९ एप्रिलला ती तिच्या बेलतरोडीतील आईच्या घरी आली होती. रात्री परत जाताना आरोपी कुणाल ढेपे, विभा वर्धेकर आणि मुस्कान शेख या तिघांनी तिला फूस लावून मध्यप्रदेशातील उज्जैन जवळच्या खाबतखेडा येथे नेले. तेथील  भरत रघुनाथ सोलंकी (वय २४) त्याच्याकडून एक लाख ७० हजार रुपये घेऊन आरोपींनी पीडित महिलेला त्याच्या हवाली केले. आरोपी सोलंकीने तिला विकत घेतल्यानंतर तो तिचा पत्नी सारखा उपभोग घेऊ लागला. त्याने तिचा मोबाइलही हिसकावून घेतला होता. तिच्यावर तो सतत पाळत ठेवायचा. गुरुवारी सकाळी संधी मिळताच पीडित महिलेने तिच्या आईच्या मोबाईलवर फोन करून तिला आपबिती सांगितली. आपले अपहरण करून अनोळखी इसमाला विकल्याचीही माहिती दिली. विशेष म्हणजे, १९ एप्रिलला रात्री ती घरून निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत घरी पोहोचली नाही. त्यामुळे तिच्या आईने बेलतरोडी पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती. त्यामुळे मुलीचा फोन येताच आई बेलतरोडी ठाण्यात पोहोचली. तेथे तिने मुलीने अपहरण झाले असून तिला विकण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. ठाणेदार विजय आकोत यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, पोलीस उपायुक्त अक्षय शिंदे यांनी त्याची गंभीर दखल घेतली. अपहृत महिलेचा फोन ज्या नंब वरून आला होता त्याचे लोकेशन काढण्यात आले. त्यानंतर बेलतरोडी  पोलिसांचे एक पथक गुरुवारी उज्जैन कडे पाठवण्यात आले. पोलीस पथकाने नमूद मोबाईल नंबरच्या आधारे पीडित महिला तसेच भरत सोलंकी या दोघांचा छडा लावला. त्यांना शुक्रवारी ताब्यात घेतले आणि शनिवारी हे पथक नागपूरला पोहोचले. या दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे महिलेची विक्री करणाऱ्या आरोपी कुणाल ढेपे, विभा वर्धेकर आणि मुस्कान शेख या तिघांना शनिवारी सायंकाळी पकडण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू होती.  आरोपी ढेपे सराईत गुन्हेगार या प्रकरणातील आरोपी कुणाल ढेपे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चोरी, घरफोडीचेही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. विकण्यात आलेल्या महिलेची माहिती मिळताच तिचा आणि आरोपींचा छडा लावण्याची प्रशंसनीय कामगिरी ठाणेदार विजय आकोत यांच्या नेतृत्वातउपनिरीक्षक विकास अजय मनपिया, हवालदार शैलेश बडोदेकर, नायक बजरंग जुनघरे, गोपाल देशमुख यांनी बजावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिलाnagpurनागपूर