शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

फेक फेसबुक 'लव्हर'च्या नादात महिलेने घेतला स्वत:च्या बाळाचा जीव, आता धक्कादायक सत्य आलं समोर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 14:17 IST

ही घटना केरळच्या कोलम जिल्ह्यातील आहे. इते कल्लूवथुक्कल गावात राहणारी एक महिला आपल्या नवजात बाळाला सोडून फेसबुक लव्हरसोबत पळून गेली.

प्रेम प्रकरणाचे अनेक अजब किस्से तुम्ही वाचले आणि ऐकले असतील. हे किस्से वाचून अनेकदा हैराणी होते तर कधी आपल्याला धक्काही बसतो. अशीच एक धक्कादायक घटना केरळमधून समोर आली आहे. इथे प्रेमासाठी एका महिलेने तिच्या बाळाला सोडलं. 

ही घटना केरळच्या कोलम जिल्ह्यातील आहे. इते कल्लूवथुक्कल गावात राहणारी एक महिला आपल्या नवजात बाळाला सोडून पळून गेली. ज्यानंतर तिच्या दोन नातेवाईकांचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला. पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, रेश्माच्या तथाकथित फेसबुक लव्हरचं अकाऊंट तिचे दोन नातेवाईक चालवत होते.

म्हणजे महिलेचे दोन नातेवाईक प्रियकर बनून तिच्यासोबत बोलत होते. जेव्हा या दोघींना वाटलं की गंमत अंगाशी येत आहेत तर पोलिसांकडून पकडल्या जाण्याच्या भीतीने त्यांनी आत्महत्या केली. तेच दुसरीकडे रबरच्या शेतात सापडलेल्या नवजात बाळाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. अशात बाळाच्या आईला शोधण्यासाठी पोलिसांनी परिसरातील अनेक महिलांचे डीएनए सॅम्पल घेतले होते. (हे पण वाचा : धक्कादायक! गर्लफ्रेन्डसोबत बोलण्यास मनाई केल्याने मुलाने त्रिशूलने केली वडिलांची हत्या)

ज्यानंतर २२ जूनला रेश्माला अटक करण्यात आली होती. रेश्माने चौकशी दरम्यान सांगितलं की, तिच्या प्रियकराने तिला सांगितलं होतं की तो तिला दुसऱ्याच्या बाळासोबत स्वीकारू शकत नाही. पोलिसांनी तपासातून समजलं की, रेश्मा तिच्या चुलत बहिणीकडून घेतलेल्या सिम कार्डचा वापर करत होती. 

पोलिसांना शंका होती की, याच सिमचा वापर फेसबुक फ्रेन्डसोबत संपर्क करण्यासाठी झाला होता. जेव्हा तिला चौकशीसाठी बोलवलं तर ती रेश्माच्या वहिनीच्या मुलीसोबत बेपत्ता झाली. या दोघी मैत्रीणी होत्या. दोघींचे मृतदेह जवळच्या एकी नदीत सापडले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKeralaकेरळ