शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

साहिललाही तशीच शिक्षा मिळावी, मुलीच्या हत्येनंतर पीडित वडिलांंचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 17:13 IST

अल्पवयीन मुलाच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर चाकून सपासप वार करत हत्या केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आलाय. या घटनेनंतर तीव्र भावना व्यक्त होत असून खासदार गौतम गंभीरनेही घटनेवर राग व्यक्त केलाय. याप्रकरणी, पोलिसांनी बुलंदशहर येथून आरोपीला अटक केली आहे. आता, पीडित मुलीच्या आई-वडिलांनी आरोपी साहिलला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलीय. तर, आरोपीलाही तशाच प्रकारे शिक्षा करावी, ज्या पद्धतीने त्याने माझ्या मुलीला ठार मारले, अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केलीय.

अल्पवयीन मुलाच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्या युवकाने १६ वर्षीय मुलीची चाकूने वार करत आणि दगडाने ठेचून हत्या केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, वाद सुरू असताना त्याने तरुणीला रस्त्यात थांबवले आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. मुलीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ इतका भयानक आहे की, तो माध्यमांमध्ये दाखवताही येत नाही. दरम्यान, मुलीचा मारेकरी साहिल याला बुलंदशहर येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेवरुन आता सोशल मीडियात संताप व्यक्त होत आहे. मुलीच्या वडिलांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, आरोपी साहिललाही तशीच शिक्षा मिळायला हवी, अशी मागणी केलीय.  आरोपीने ज्या पद्धतीने माझ्या मुलीला मारले, त्याच प्रकारची शिक्षा आरोपीला मिळावी. म्हणजे, यापुढे कोणीही असे कृत्यू करणार नाही, असे पीडित वडिलांनी म्हटले. तसेच, माझी मुलगी खूप चांगली होती. मला साहिल आणि मुलीबद्दल काहीही माहिती नव्हते, पोलिसांच्या तपासातच काही माहिती कळाली, असेही मुलीच्या वडिलांनी म्हटले. दरम्यान, मुलगी गेल्या १० दिवसांपासून तिच्या मैत्रिणीच्या घरी राहात होती, असे मुलीच्या आईने सांगितले. 

अल्पवयीन मुलगी रस्त्यावरून जात असताना अचानक एका मुलाने तिला अडवून तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने मुलीला दगडाने ठेचून ठार केले. विशेष म्हणजे ही घटना घडत असताना, बाजुला काही व्यक्ती उभ्या असलेल्या, तेथून जात असलेल्या दिसून येतात. मात्र, कुणीही त्या आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. यावरुन, गौतम गंभीरने ट्विट करुन संताप व्यक्त केला आहे. जर तुमच्या बहिण किंवा मुलीवर असा वैश्यी हल्ला झाला असता तरी हे लोकं असेच चालत, बघत पुढे गेले असते का, जनावर फक्त तोच नाही, तर सगळेच आहेत, असे म्हणत गंभीरने दिल्लीतील घटनेवर संताप व्यक्त केला आहे. 

हल्ल्याचे कारण काय?

पोलीस तपासात आरोपीचे नाव साहिल असून वडीलांचे नाव सर्फराज असल्याचे समोर आले. अल्पवयीन मुलगीही दिल्लीची रहिवासी होती. साहिल आणि ती मुलगी रिलेशनशिपमध्ये असल्याचे पोलिसांनी, मिळालेल्या माहितीनुसार सांगितले. प्रेम संबंधातील मतभेदामुळे रविवारी त्यांच्यात वाद झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला जात असताना साहिलने तिला रस्त्यातच अडवले. दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने साहिलने मुलीवर चाकूने हल्ला केला. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्ली