शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंह राजपूतच्या भावावर गोळीबार करणाऱ्यांना अटक, मिळाली होती 5 लाखांची सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 09:44 IST

Crime News : भररस्त्यात काही अज्ञातांनी सुशांतच्या भावासह आणखी एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या होत्या.

नवी दिल्ली - छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली होती. काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली होती. भररस्त्यात काही अज्ञातांनी सुशांतच्या भावासह आणखी एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर आता पोलिसांनी सुशांतच्या भावाला गोळ्या घालणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या एका सहकाऱ्यांवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार सिंह आणि त्यांचे साथीदार असलेल्या अमीर हसन यांना 30 जानेवारी रोजी गोळ्या घालण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सुशांत सिह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह यांचं मधेपुरा येथे मोटारसायकल शोरूम आहे. मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. या हल्ल्यात राजकुमार सहीत त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाला होता. यामध्ये सहकारी अमीर हसनची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

मिळाली होती 5 लाखांची सुपारी

सहारसाचे एसपी लिपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीवरून झालेल्या वादावरून ही घटना घडली. यामाहा शोरूमचे मालक राजकुमार सिंहचा छोटा भाऊ आणि शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक उमेश दालान यांच्यात पूर्वीपासूनच जमिनीवरून वाद सुरू आहेत. याच कारणावरून उमेश दालानने विकी चौबे नावाच्या एका व्यक्तीला भावाला मारण्याची 5 लाखांची सुपारी दिली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी एसआयटी टीम गठीत केली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता आरोपींबद्दलची माहिती मिळाली. फोन लोकेशनवरून आरोपींच्या पत्ता लागला. 

बिंदेश्वरी यादव नावाच्या गुन्हेगारासह 5 जणांना अटक

पोलिसांनी याठिकाणी छापा टाकत बिंदेश्वरी यादव नावाच्या गुन्हेगारासह 5 जणांना अटक केली. या आरोपींना याआधीही अनेक गुन्हे केले आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राजकुमार सिंह मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गाडीला ओव्हर टेक करत गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजकुमार सिंह आणि त्याच्या सहकाऱ्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSushant Singhसुशांत सिंगFiringगोळीबारPoliceपोलिसArrestअटक