मुंबईसह देशातील ८ शहरांत  महिलांच्या सुरक्षेसाठी 'सुरक्षित शहर - निर्भया उपक्रम'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 06:47 PM2019-08-07T18:47:00+5:302019-08-07T18:51:26+5:30

हा प्रकल्प मुंबई शहरासह ८ प्रमुख शहरांत राबविला जाणार आहे. 

 'Safe City - Nirbhaya Initiative' for the safety of women in 5 cities of the country including Mumbai | मुंबईसह देशातील ८ शहरांत  महिलांच्या सुरक्षेसाठी 'सुरक्षित शहर - निर्भया उपक्रम'

मुंबईसह देशातील ८ शहरांत  महिलांच्या सुरक्षेसाठी 'सुरक्षित शहर - निर्भया उपक्रम'

googlenewsNext
ठळक मुद्देमोठ्या शहरांत महिला सुरक्षेच्या उपाययोजना व्यवस्थेला अधिक कार्यक्षम करण्याचे संकल्पित करण्यात आले आहे. मुंबई पोलीस दलाने मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय येथे ६ ऑगस्ट रोजी संबंधित व्यक्तींकरिता एक दिवसीय विचारविनिमय कार्यशाळा आयोजित केली होती.

मुंबई - सुरक्षी शहर - निर्भया उपक्रम हा प्रमुख प्रकल्प भारत सरकारच्या गृ मंत्रालयाच्या महिला सुरक्षा विभागाकडून सुरु करण्यात आलेला असून त्याअंतर्गत मोठ्या शहरांत महिला सुरक्षेच्या उपाययोजना व्यवस्थेला अधिक कार्यक्षम करण्याचे संकल्पित करण्यात आले आहे. हा प्रकल्प मुंबई शहरासह ८ प्रमुख शहरांत राबविला जाणार आहे. 

३ वर्षाकरिता राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश हा मुंबई शहरातील महिला आणि लहान मुले यांच्या सुरक्षा व संरक्षणाच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे बळकटीकरण करणे असा आहे. यासाठी तंत्रज्ञानाची प्रगत साधने, प्रगत पायाभूत सुविधा, संबंधित विविध व्यक्तीचे प्रशिक्षण आणि कौशल्य विकास, जनजागृती आणि विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम या विविध आयुधांचा वापर करण्यात येणार आहे. महिला आणि लहान मुले यांच्याशी संबंधित व्यक्तींमध्ये अशा गुन्ह्याबाबत माहिती व उचित दृष्टिकोन यांचा अभाव असतो. हा अभाव दूर करण्यासाठी त्या व्यक्तींचे प्रशिक्षण व कैशल्यविकास करणे या बाबीचन्ह समावेश निर्भया योजनेत करण्यात आला आहे. प्रशिक्षण व कौशल्यविकास कार्यक्रमांतर्गत कायद्याची अंबलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतील ऐकून २५ हजार व्यक्तींचे (ज्यामध्ये पोलीस अंमलदार ते पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे), ४२०० वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी व डॉक्टर्स आणि २०० सरकारी वकील यांना प्रशिक्षित करण्याची योजना आहे. 

या उपक्रमांतर्गत मुंबई पोलीस दलाने मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय येथे ६ ऑगस्ट रोजी संबंधित व्यक्तींकरिता एक दिवसीय विचारविनिमय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला देशभरातील नावाजलेल्या गैर शासकीय संस्था (एनजीओ), शैक्षणिक संस्था आणि सल्लागार संस्था या एकत्र आल्या होत्या. या कार्यशाळेत महिला व लहान मुले यांच्या संरक्षण व सुरक्षितेकरिता कार्य करणाऱ्या विविध संघटनांच्या जाळ्यात जाणून घेण्यास प्रयत्न करणे आणि त्या संघटनांच्या मौल्यवान अनुभवाच्या व नैपुण्याचा उपक्रम करून घेणे हा कार्यशाळा आयोजनामागील उद्देश होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता हे होते. तसेच मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

Web Title:  'Safe City - Nirbhaya Initiative' for the safety of women in 5 cities of the country including Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.