शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Vaze: सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार, कोर्टाने अर्ज केला मंजूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 16:42 IST

Sachin Vaze: १०० कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये सध्या तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय कोर्टात दाखल केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे.

मुंबई - १०० कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये सध्या तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय कोर्टात दाखल केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. काही अटीशर्तींसह कोर्टाने हा अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने राज्याचे  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनविण्याची मागणी केली होती. सचिन वाझेंने याबाबत विशेष सीबीआय कोर्टात अर्जही दाखल केला होता. सीबीआयने त्याच्या अर्जाला सशर्त मंजुरी दिली असून त्यावर कोर्टाने आज निर्णय दिला आहे.

दरम्यान, आधीच्या सीबीआय चौकशीमध्ये सचिन वाझे याने  अनेक गंभीर गौप्यस्फोट केले होते. गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी पदाचा गैरवापर केला होता, असा दावा सचिन वाझे याने चौकशीमध्ये केला होता. दरम्यान, या १०० कोटी वसुली प्रकरणामध्ये वाझे माफीचा साक्षीदार होणार आहेय त्यामुळे अनिल देशमुखांसह इतर आरोपींच्या अडचणी वाढणार आहेत. तसेच १०० कोटींच्या वसुलीबाबत सबळ पुरावे दिल्य़ाची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेला सर्व तरतुदी त्याचप्रमाणे कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. विशेष सीबीआय कोर्टाने सचिन वाझेचा अर्ज स्वीकारल्याने आता त्यांचा जबाब फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवला जाईल. तसेच इतर आरोपींविरुद्ध पुरावे वापरले जाऊ शकतात. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुखCourtन्यायालय