शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबियांना जीवे मारण्याची दिली धमकी, सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 21:49 IST

Sachin Vaze : अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही वाजे यांनी केला आहे.

मुंबई - एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्यानुसार, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन  वाझे  काल चांदीवाल आयोगासमोर हजर झाला. त्याचवेळी देशमुख यांच्या सूचनेवरून  वाझे याने बारमधून खंडणी वसूल केल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच एएनआयच्या वृत्तानुसार, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन  वाझे यांनी शपथपत्रात म्हटले आहे की, अनिल देशमुख यांनी त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही वाजे यांनी केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दावा केला होता की, अनिल देशमुख यांनी वाजेला बार आणि हुक्का पार्लरमधून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते. त्याच वेळी, माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने न्या.चांदीवाल समितीची स्थापना केली होती.

तसेच मुंबईतील बार वसुलीप्रकरणी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात मोठी खेळी केली आहे. वाझेने थेट ईडीलाच प्रस्ताव दिला असून मनी लाँड्रिंग प्रकरणी माफीचा साक्षीदार बनविण्याची मागणी केली आहे. 

 

 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखsachin Vazeसचिन वाझेCorruptionभ्रष्टाचारParam Bir Singhपरम बीर सिंग