शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

Sachin Vaze : मला बळीचा बकरा बनवलं जातंय म्हणत सचिन वाझेंचं कोर्टात धक्कादायक विधान, केला मोठा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 17:22 IST

Sachin Vaze Case : आज सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टासमोर (NIA Court) धक्कादायक विधान केले आहे. या प्रकरणात मला बळीचा बकरा बनवलं जातंय, असे वक्तव्य सचिन वाझे यांनी कोर्टात केले आहे.

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने तपास सुरू करत पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक केली होती. आता सचिन वाझेंच्या (Sachin Vaze) चौकशीमधून एनआयएने या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आणली आहे. मात्र आज सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टासमोर (NIA Court) धक्कादायक विधान केले आहे. या प्रकरणात मला बळीचा बकरा बनवलं जातंय, असे वक्तव्य सचिन वाझे यांनी कोर्टात केले आहे. (Sachin Vaze's shocking statement in court saying I am being made a scapegoat, made a big claim ...) 

याबाबत कोर्टाला माहिती देताना सचिन वाझे म्हणाले की, या प्रकरणाशी माझे काहीही देणेघेणे नाही. मला या प्रकरणामध्ये बळीचा बकरा बनवलं जातंय. मी केवळ या प्रकरणाचा तपास करत होतो. मी आतापर्यंतच्या तपासात एनआयएला सहकार्य केले आहे. त्यामुळे मला पुन्हा एनआयए कोठडी देऊ नका, अशी विनंती सचिन वाझे यांनी केली. मात्र सचिन वाझेंची ही विनंती नाकारत सचिन वाझेंना ३ एप्रिलपर्यंत एनआयएची कोठडी सुनावली आहे. 

दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सचिन वाझे यांनीच ठेवली होती. असा दावा एनआयएने तपासानंतर केला आहे. तर मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये सचिन वाझे यांचा सहभाग होता. सचिन वाझे यांच्यासमोरच मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली, असा दावा एटीएसने केला आहे. 

काही दिवसांपूर्वी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर त्यांना एनआयए न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी दिली होती. या कोठडीची मुदत आज संपल्याने सचिन वाझे यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी सचिन वाझेंना दणका देताना त्यांच्या एनआयए कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMumbaiमुंबईMansukh Hirenमनसुख हिरणCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी