शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Sachin Vaze: सचिन वाझेंची पुन्हा प्रकृती बिघडली; मध्यरात्री डॉक्टरांकडून उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 08:45 IST

Sachin Vaze Arrested by NIA: सचिन वाझे यांना शनिवारी 11.30 च्या सुमारास एनआयएन अटक केली होती. सुमारे 12 तास त्यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. तसेच स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्यानंतर चालकाने मुंबई पोलिसांच्याच क्राईम ब्रांचच्या इनोव्हा कारमधून पलायन केले होते.

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांची तब्येत पुन्हा बिघडली होती. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले होते. (doctor tratment on Sachin Vaze at Nia Office)

सचिन वाझे यांना शनिवारी 11.30 च्या सुमारास एनआयएन अटक केली होती. सुमारे 12 तास त्यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. तसेच स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्यानंतर चालकाने मुंबई पोलिसांच्याच क्राईम ब्रांचच्या इनोव्हा कारमधून पलायन केले होते. ही इनोव्हादेखील एनआयएने ताब्यात घेतली असून रविवारी याच्या जोरावर वाझे यांची 11 दिवसांची कोठडी मिळविली आहे. 

रविवारी वाझे यांच्या हातावर न्यायालयात नेताना सलाईन लावल्याची पट्टी दिसत होती. रविवारी रात्रीदेखील एनआयएने डॉक्टर बोलावले होते. या डॉक्टरांनी वाझे यांची तपासणी करून रात्री १ च्या सुमारास एनआयए कार्यालयाबाहेर गेल्याचे सुत्रांनी सांगितले. NIA ने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. शनिवारी रात्रीदेखील वाझे यांना चौकशीमुळे थकवा जाणवत होता. यामुळे त्यांच्यावर जेजे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. याबाबतचे वृत्त एका टीव्ही चॅनलने दिले आहे.

सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले दोन अधिकारी व दोघा वाहनचालकांची साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. आणखीही काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. रियाझ काझी हे गेल्या ३ वर्षांपासून सीआययूमध्ये कार्यरत आहेत. सीआययू विभागात सचिन वाझे हे कार्यरत आहेत. जानेवारी महिन्यात टीआरपी घोटाळ्याप्रकरणी केलेल्या कामगिरीबद्दल बेस्ट डिटेक्शन म्हणून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सहायक पोलीस आयुक्त शशिकांत सांडभोर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, नितीन लोंढे, संतोष कोटवान आणि रियाझ काझी यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले होते.

सचिन वाझेंवरील दाखल कलमे -कलम २८६ : जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटके बाळगणे, इतरांच्या जिवाला धोका होईल असे वर्तन करणेकलम ४६५ : खोट्या किंवा बनावट गोष्टी करणेकलम ४७३ : दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृतीकलम ५०६(२) : दहशत निर्माण करणे किंवा धमकी देणेकलम १२० ब  : गुन्हेगारी स्वरूपाच्या षड्‌यंत्रात सहभाग घेणेस्फोटक पदार्थ कायदा १९०८ कलम ४ अ, ब – स्फोटके बाळगण्याचायात समावेश आहे.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाdoctorडॉक्टर