शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Vaze : सचिन वाजेंचा मोबाईल, कॉम्प्युटरसह कागदपत्रे जप्त; NIA कडून CIU कार्यालयाची झाडाझडती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 18:08 IST

Sachin Vaze : Sachin vaje's mobile, computer and documents seized; CIA office sweep from NIA- काल उशिरा रात्री मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत CIU विभागाची झाडाझडती घेऊन सचिन वाझे यांचा कॉम्प्युटर, मोबाईल आणि महत्वाचे कागदपत्रे हस्तगत केली आहेत. 

ठळक मुद्देCIU कार्यालयातून NIA च्या पथकाने सचिन वाझे यांचा मोबाईल, कॉम्प्युटर आणि महत्वाचे कागदपत्रे जप्त केली आहेत.

मुंबई -  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया निवास्थानाबाहेर स्फ़ोटकांसह स्कॉर्पिओ कार प्रकरणी  राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA ) शनिवारी उशिरा रात्री निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी बेड्या ठोकल्या. कोर्टाने त्यांना २५ मार्चपर्यंत NIA कोठडी सुनावली असून NIA ने या तपासासाठी कंबर कसली आहे. काल उशिरा रात्री मुंबईपोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत CIU विभागाची झाडाझडती घेऊन सचिन वाझे यांचा कॉम्प्युटर, मोबाईल आणि महत्वाचे कागदपत्रे हस्तगत केली आहेत. 

 

NIA कडून आतापर्यंत CIU च्या ७ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. पुरावे मिळविण्याच्या उद्देशाने NIA ने ही झाडाझडती घेतली. मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या समोर NIA ने CIU कार्यालयात सर्च ऑपरेशन केले आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीत CIU चे कार्यालय आहे. CIU कार्यालयातून NIA च्या पथकाने सचिन वाझे यांचा मोबाईल, कॉम्प्युटर आणि महत्वाचे कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यामुळे सचिन वाझेंबाबत मोठे खुलासे होऊ शकतात. त्यांची महत्वाची माहिती NIA च्या हाती लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. 

 

हा तर नियतीचा न्याय, सचिन वाझेंच्या अटकेवर ख्वाजा युनुसच्या आईची प्रतिक्रिया

 

२५ फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर स्फोटके मिळाल्याचे समजल्यानंतर एटीएसचे पथक त्याठिकाणी पोहोचले. तेव्हा एटीएसच्या अधिकाऱ्याने स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कुठे आहे, असा सवाल सचिन वाझे Sachin Vaze यांना विचारला. त्यावेळी सचिन वाझे सँडविच खात उभे होते. त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला, साहेबांना गाडी दाखव, असे सांगितले. सचिन वाझे यांच्या या वर्तणुकीमुळे संबंधित एटीएस अधिकारी प्रचंड संतापला होता. सचिन वाझे यांनी पोलिसांच्या प्रोटोकॉलचे पालन केले नाही, अशी तक्रारही त्याने वरिष्ठांना केल्याची माहिती मिळत आहे.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाraidधाडMumbaiमुंबईPoliceपोलिस