शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Vaze : प्रॅडो कारचे गूढ अखेर आलं बाहेर; जिलेटीन कांड्या मुंबईत आणण्यासाठी झाला होता वापर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 21:46 IST

Sachin Vaze: लगेच दुसऱ्या दिवशी २६ फेब्रुवारीला वाझे यांनी मनसुख यांना चौकशीसाठी या प्रॅडो कारमधून पोलीस मुख्यालयात आणले होते.  

ठळक मुद्दे स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवण्याआधी ती स्फोटके प्रॅडो गाडीतून नागपूरहून मुंबईत आणण्यात आली असल्याचा NIA ला संशय आहे.

एनआयएने सचिन वाझे हे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समधून ताब्यात घेतलेल्या  प्रॅडो कारचं गूढ अखेर उघड झालं आहे. एनआयएच्या तपासात स्फोटकांची वाहतूक नागपूरहून मुंबईत याच कारने केल्याच्या संशय आहे. त्यामुळे एनआयएने हि  प्रॅडो कार ताब्यात घेतली आहे. 

स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवण्याआधी ती स्फोटके प्रॅडो गाडीतून नागपूरहून मुंबईत आणण्यात आली असल्याचा NIA ला संशय आहे. याच प्रॅडो कारमधून   मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांनी २६ फेब्रुवारीला एकत्रित प्रवास करून मुंबई पोलीस आयुक्तालय गाठले होते. २५ फेब्रुवारीला उद्यऑप्टी मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया निवास्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ कार जिलेटीनच्या कांड्यासह सापडली. नंतर ती स्कॉर्पिओ मनसुख यांच्या ताब्यातील असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी २६ फेब्रुवारीला वाझे यांनी मनसुख यांना चौकशीसाठी या प्रॅडो कारमधून पोलीस मुख्यालयात आणले होते.  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने (राष्ट्रीय तपास संस्था) मागील शनिवारी रात्री उशिरा मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली होती. एनआयएने दिवसभर वाझे यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. कंबाला हिल येथील एनआयएच्या ऑफिसमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास वाझे गेले होते. चौकशीनंतर रात्री ११.५० वाजता त्यांना अटक केली होती. त्यानंतर वाझे यांना २५ मार्चपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. 

Mansukh Hiren : मनसुख हिरेनप्रकरणी ATS च्या हाती महत्वाचे धागेदोरे; पोलीस अधिकारी सुनील माने यांची चौकशी सुरु 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाcarकारnagpurनागपूर