गौशाळेबाहेर चिमुरड्याला सोडलं, बॅगमध्ये महिलेचा मृतदेह सापडला; ‘मर्डर मिस्ट्री’नं पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 10:46 AM2021-10-12T10:46:33+5:302021-10-12T10:47:34+5:30

Sachin dixit case: काही वेळांनी गौशाळेचे कर्मचारी गेटजवळ पोहचले त्यांनी लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला.

Sachin Dixit had killed her live in partner before abandoning infant Son at gaushala in Gandhinagar | गौशाळेबाहेर चिमुरड्याला सोडलं, बॅगमध्ये महिलेचा मृतदेह सापडला; ‘मर्डर मिस्ट्री’नं पोलीस हादरले

गौशाळेबाहेर चिमुरड्याला सोडलं, बॅगमध्ये महिलेचा मृतदेह सापडला; ‘मर्डर मिस्ट्री’नं पोलीस हादरले

googlenewsNext
ठळक मुद्देसकाळ होईपर्यंत या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा चिमुरड्याचा चेहरा पाहून प्रत्येकाच्या मनाला वेदना होत होतीगृहमंत्र्याच्या आदेशानंतर गांधीनगर पोलिसांनी परिसरातील ८५ पोलिसांच्या १४ विविध टीम्स बनवल्या. पोलिसांनी सचिन दीक्षितच्या घराचा मागोवा घेतला तेव्हा घराला कुलूप असल्याचं समोर आलं.

अहमदाबाद - गुजरातच्या गांधीनगर येथे गौशाळेबाहेर सापडलेल्या मुलाबाबत धक्कादायक खुलासा उघड झाला आहे. गौशाळेच्या गेटबाहेर १० महिन्याच्या चिमुरड्याला दुसऱ्या कुणी नसून त्याच्या जन्मदात्या पित्यानेच सोडलं आहे. या चिमुरड्यासोबत घडलेली घटना त्याहून अधिक ह्द्रयद्रावक आहे. ८ ऑक्टोबरच्या रात्री एक व्यक्ती चिमुरड्याला घेऊन इथं आला आणि त्याने गौशाळेच्या गेटबाहेर त्याला सोडलं. आसपास कुणीही नव्हतं हे पाहून त्याने तिथून पळ काढला.

काही वेळांनी गौशाळेचे कर्मचारी गेटजवळ पोहचले त्यांनी लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला. कर्मचाऱ्यांनी पाहिलं तर चिमुरडा रडत होता. त्यांनी मुलाला उचलून गौशाळेत घेऊन गेले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याच्या आई वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण कुणी सापडलं नाही. त्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली.ही बातमी स्थानिक नगरसेविका दिप्ती पटेल यांच्याकडे पोहचली. रात्री दिप्ती पटेल यांनी या लहान मुलाची काळजी घेतली. सकाळ होईपर्यंत या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा चिमुरड्याचा चेहरा पाहून प्रत्येकाच्या मनाला वेदना होत होती. अनेकांनी या मुलाला दत्तक घेण्याची तयारी दाखवली. गृहमंत्री हर्ष सांघवी यांच्याकडे ही माहिती पोहचली. ते मुलाला पाहण्यासाठी हॉस्पिटलला गेले आणि या मुलाच्या आई वडिलांना शोधून काढणार असल्याचं त्यांनी घोषित केले.

१५० सीसीटीव्ही तपासले अन् पोलिसांना पुरावा मिळाला

गृहमंत्र्याच्या आदेशानंतर गांधीनगर पोलिसांनी परिसरातील ८५ पोलिसांच्या १४ विविध टीम्स बनवल्या. सर्वात आधी गौशाळेजवळील सीसीटीव्हीचा शोध घेतला. १५० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अखेर पोलिसांना यश आलं. एक व्यक्ती सेट्रो कारमधून गौशाळेला येतो आणि चिमुरड्याला सोडून जातो. सीसीटीव्हीत त्या कारचा नंबरचा शोध घेत पोलीस त्याच्या मालकापर्यंत पोहचतात. तेव्हा सचिन दीक्षित नाव समोर येते.

पोलिसांनी सचिन दीक्षितच्या घराचा मागोवा घेतला तेव्हा घराला कुलूप असल्याचं समोर आलं. आतापर्यंत सचिनचा नंबरही पोलिसांना सापडला. लोकेशन ट्रेस केले तर तो राजस्थानच्या कोटा येथे असल्याचं समजलं. पोलिसांनी फोन केला तेव्हा सचिनने तो मुलगा माझाच असल्याचं कबूल केले. त्या मुलाचे नाव शिवांश होते. राजस्थान पोलिसांच्या मदतीने सचिनला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा तो पत्नी आणि त्याच्या ४ वर्षाच्या मुलासह सेट्रो कारने उत्तर प्रदेशात चालला होता. गौशाळेबाहेर मुलाला सोडण्याबाबत पोलिसांनी विचारलं तेव्हा तो गप्प बसला. त्यानंतर सचिनच्या पत्नीला पोलिसांनी विचारले तेव्हा ती हैराण झाली. ती म्हणाली मला एकच मुलगा आहे. आणि तो माझ्यासोबत आहे. शिवांशला ती ओळखतही नव्हती. त्यामुळे पोलीस हैराण झाले.

त्यानंतर पोलिसांनी सचिनशी कसून चौकशी सुरू केली तेव्हा त्याने एका घराचा पत्ता दिला. पोलीस या पत्त्यावर जाऊन घरी शोधतात तेव्हा त्यांना एका बॅगेत महिलेचा मृतदेह आढळतो. या मृतदेहाचा दुर्गंध येत होता. सचिनने पोलिसांना जे सांगितले ते धक्कादायक होतं. गुजरातच्या गांधीनगरमध्ये सचिन एका कंपनीत कामाला होता. ४ वर्षापूर्वी त्याने घरच्यांच्या सांगण्यावरुन अनुराधासोबत लग्न केले. त्याला ३ वर्षाचा मुलगा आहे. २०१८ मध्ये सचिनची भेट हिना नावाच्या मुलीसोबत झाली. या दोघांमध्ये मैत्री आणि त्यानंतर प्रेम झालं. दोघंही एकाच फ्लॅटवर भाड्याने राहत होते. सचिन आठवड्याचे ५ दिवस वडोदरा इथं हिनासोबत राहायचा तर २ दिवस अहमदाबादमध्ये कुटुंबाला भेटायला यायचा. डिसेंबर २०२० मध्ये हिनाने एका मुलाला जन्म दिला. दोघांनीही लग्न केले नव्हते. लग्नासाठी हिना नेहमी सचिनवर दबाव टाकायची.

८ ऑक्टोबरला सचिन आणि हिना यांच्यात जोरदार भांडण झालं. हे भांडण इतकं जोरात झालं की रागाच्या भरात सचिनने हिनाचा गळा आवळून खून केला. हिनाच्या मृत्यूनंतर त्याने घरातील एका सुटकेसमध्ये तिचा मृतदेह ठेवला आणि लहान शिवांशला घेऊन गांधीनगरला जाऊन गौशाळेबाहेर गेटवर ठेवले. हिना भोपाळची रहिवाशी होती. १० महिन्यापूर्वी तिने शिवांशला जन्म दिला होता. तर सचिनच्या कुटुंबाला हिना आणि शिवांशबाबत काहीच माहिती नसल्याचंही समोर आलं.

Read in English

Web Title: Sachin Dixit had killed her live in partner before abandoning infant Son at gaushala in Gandhinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Gujaratगुजरात