शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

रक्षक बनला भक्षक! हतबलतेचा गैरफायदा घेत पोलीस अधिकाऱ्याकडून रशियन महिलेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 13:48 IST

गुन्हा दाखल केला जात असल्याचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक (प्रवक्ते) यांनी सांगितले.

ठळक मुद्देभानुदास उर्फ अनिल जाधव असे या अधिकाऱ्याचे नाव अ३८ वर्षीय पीडित रशीयन तरुणीने पोलिसांत लेखी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या तरुणीला काश्मिरी ओळख मिळवून देण्यासाठी फिरोजा खान या नावाने खोटे पुरावे तयार करुन दिले.

मुंबई - व्हिसाची मुदत संपल्याने अडचणीत असलेल्या एका रशियन तरुणीच्या हतबलतेचा गैरफायदा घेत पोलीस अधिकाऱ्यानेच १२ वर्षे बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. भानुदास उर्फ अनिल जाधव असे या अधिकाऱ्याचे नाव असून ३८ वर्षीय पीडित रशियन तरुणीने पोलिसांत लेखी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल केला जात असल्याचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक (प्रवक्ते) यांनी सांगितले.

पीडित तरूणी डिसेंबर २००३ मध्ये सहा महिन्यांच्या व्हिसावर भारतात आली होती. तिला फिल्म इंड्रस्ट्रीमध्ये करीयर करायचे होते. सहा महिन्यांची व्हिसाची मुदत संपल्यावर भानुदास जाधव या अधिकाऱ्याने व्हिसा वाढवून देण्यात मदत करण्याच्या बहाण्याने तरूणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला. याच कामाचे निमित्त सांगत तिचा पासपोर्ट आपल्या ताब्यात घेतला. बड्या चित्रपट निर्मात्यांशी ओळख असल्याचे भासवतानाच व्हिसा संपला तरी दंड भरुन भारतात राहता येते, अशी बतावणी त्याने केली. मात्र ही रशियन तरूणी भुलथापांना बळी पडत नसल्याचे पाहून तरूणीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. पुढे नोव्हेंबर २००६ साली हा अधिकारी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षात कार्यरत असताना त्याने खोट्या दस्ताऐवजांच्या आधारे या तरुणीला काश्मिरी ओळख मिळवून देण्यासाठी फिरोजा खान या नावाने खोटे पुरावे तयार करुन दिले. या नावाच्या आधारेच वर्सोवा परिसरात पेईंग गेस्ट म्हणून तिची राहाण्याची सोयसुद्धा केली. त्यानंतर या तरुणीला चेंबूरमधील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावू नशेची गोळी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याचे अत्याचार सुरुच होते. दरम्यानच्या काळात त्याने तरुणीला आणखी काही बनावट दस्तऐवज बनवून दिले. या काळात तरुणी गर्भवती राहिल्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले.

पुढे ही तरुणी पुण्याला स्थायिक झाल्यावर तिथेही माग काढात पुन्हा शारिरीक संबंध बनविले. यातून ती पुन्हा गर्भवती राहीली. यावेळी लग्नानंतर मुलबाळ होऊ देऊ  नको, असे सांगत गर्भपात करायला लावले. पुढे अली हे नाव घेऊन धर्म बदलत त्याने तिच्यासोबत लग्नसुद्धा केले. विवाहानंतर एप्रिल २०१४ मध्ये तरुणीने एका मुलाला जन्म दिला. मात्र मुलाला एका नातेवाईकाकडे ठेवत या अधिकाऱ्याने गेल्याच वर्षी तरुणीची रशियाला पाठवणी केली. ती पुन्हा भारतात येणार नाही अशी तजवीजही केली. मात्र जून २०१९ मध्ये ही तरुणी भारतात आली. पुण्यातील घर गाठले असता हा अधिकारी अन्य एका तरुणीसोबत असल्याचे तिने पाहिले. त्यानंतर घडलेला प्रकार अधिकाऱ्याच्या मित्राच्या पत्नीला सांगून आपल्या मुलाला परत मिळवत पोलिसांत धाव घेतली. दरम्यानच्या काळात या अधिकाऱ्याने आपल्याला आणि आपल्या मुलाला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्याने एका तरुणीला ड्रग्ज देऊन तिच्यावर बलात्कार केला. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत त्याने तरुणीच्या भावालाही ठार केले. याचे आपण प्रत्यक्षदर्शी साक्षिदार असल्याचाही आरोप या रशीयन तरुणीने केला आहे.एसीबीच्या जाळ्यात

२८ सेप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जाधवला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणी अटक केली. या प्रकरणात जाधव यांना निलंबीत केले होते.

टॅग्स :Rapeबलात्कारPregnancyप्रेग्नंसीAbortionगर्भपातrussiaरशियाPoliceपोलिसPuneपुणेMumbaiमुंबई