शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-कोणार्क विकास आघाडीमध्ये राडा; ४४ जण अटकेत; भिवंडीतील घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 07:00 IST

आरोपींना सोमवारी सायंकाळी भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरात भाजप व कोणार्क विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी रात्री झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील ४४ जणांना अटक केली आहे. यात विलास पाटील गटातील ३५ जणांना तर आ. महेश चौघुले गटातील ८ जणांचा समावेश आहे. आरोपींना सोमवारी सायंकाळी भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले.

राड्याप्रकरणी चौघुले गटाचे भावेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून माजी महापौर विलास पाटील यांसह १०० ते १५० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर विलास पाटील गटाचे हर्ष वरळीकर यांच्या तक्रारीवरून चैतन्य पुल्लेवार व इतर १५ ते २० जणांविरोधात निवडणूक जिंकल्याचा राग मनात ठेऊन पाटील यांच्या रत्नदीप बंगला येथे हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

तिसरा गुन्हा हा राजू तडका यांच्या फिर्यादीवरून भाजप उमेदवार रितेश टावरे व त्यांचे १०० ते १५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर चौथा गुन्हा निजामपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वास डगळे यांनी विलास पाटील व त्यांचे १०० ते १५० तसेच भाजप उमेदवार टावरे व त्यांच्या ३० ते ४० जणांवर गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, ॲड. मयुरेश पाटील हे सदस्य असलेल्या भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली वकिलांनी सोमवारी दुपारी पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध केला. निजामपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वास डगळे यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी चन्ने यांनी केली.

‘फॉरेन्सिक’चे पथक पुरावे गोळा करण्यासाठी दाखल

सोमवारी आ. चौघुले यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फॉरेन्सिक लॅब पथक दाखल होत घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले. परिसरात तणावाचे वातावरण असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.

खबरदारी म्हणून भिवंडीत पोलिसांचा रूट मार्च

भाजप व कोणार्क गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवाच्या राड्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. खबरदारी म्हणून भिवंडी पोलिसांकडून सोमवारी रात्री कोंबडपाडा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रूट मार्च काढण्यात आला. यावेळी भिवंडी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिस सहभागी झाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Brawl in BJP-Konark Alliance: 44 Arrested, Tension Grips Bhiwandi

Web Summary : Clash between BJP and Konark Alliance workers in Bhiwandi led to 44 arrests. Police filed multiple cases, including attempted murder. Tensions remain high, with businesses closed and police conducting route marches. Forensic teams collected evidence from the scene.
टॅग्स :BhiwandiभिवंडीMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Bhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६