शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

RTI कार्यकर्ते आणि पत्रकाराची निर्घृण हत्या, रस्त्यावर आढळला जळालेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 15:08 IST

पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.

मधुबनी:बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी परिसरात पुन्हा एका हत्येच्या घटनेने खळबळ माजली आहे. येथे रस्त्याच्या कडेला एका 25 वर्षीय तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह पोत्यात बांधलेला आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. बुधीनाथ झा उर्फ ​​अविनाश असे मृताचे नाव असून तो बेनीपट्टी बाजार येथील रहिवासी होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुद्धीनाथ झा हे आरटीआय कार्यकर्ते म्हणून काम करायचे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पत्रकारिताही करायचे. नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 नोव्हेंबरच्या रात्रीपासून बुद्धिनाथ झा बेपत्ता होते. तीन दिवस शोध घेतल्यानंतर अखेर 11 नोव्हेंबर रोजी कटुंबियांनी बेनीपट्टी पोलिस ठाण्यात बुद्धिनाथ झा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर बेनिपट्टी पोलिस बेपत्ता तरुणाचा शोध घेत होते. दरम्यान, बेनीपट्टी पोलिस ठाण्याच्या उदेन गावात राज्य महामार्ग क्रमांक 52 जवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपातून एका 25 वर्षीय तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. तपासानंतर मृतदेह बुद्धिनाथ झा उर्फ ​​अविनाश यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

बुद्धिनाथ झा आरटीआय कार्यकर्ते होते

मृतदेह सापडल्यानंतर बेनिपट्टी पोलिसांनी नव्याने गुन्हा दाखल करुन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी बुद्धिनाथ झा यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आली आहे. बेनीपट्टी पोलिस स्टेशनचे प्रभारी अरविंद कुमार म्हणतात की, पोलिस पथक या प्रकरणात अनेक पैलूंचा तपास करत आहे. लवकरच प्रकरण उघडकीस येईल, अशी आशा आहे.

मृतांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, बुद्धिनाथ झा हे आरटीआय कार्यकर्ते म्हणून काम करायचे आणि त्यांनी बेनिपट्टीतील काही बेकायदेशीरपणे चालवल्या जाणार्‍या खाजगी नर्सिंग होमच्या विरोधात काही महत्त्वाची माहिती गोळा केली होती. याप्रकरणी प्रशासनाकडे कारवाईची मागणीही केली होती. पण, त्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात आली आहे.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJournalistपत्रकार