शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन मागितले ५ रुपये अन् काढून घेतले दिड लाख; भाजपा महिला कार्यकर्त्यास घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 21:32 IST

Online Fraud : मीरारोडच्या मेरीगोल्ड भागातील संस्कृती इमारतीत राहणाऱ्या भाजपा कार्यकर्त्या स्वाती बन्साली यांना त्यांचे पती राजकुमार यांनी २३ डिसेंबर रोजी दुपारी कॉल केला.

मीरारोड - पतीच्या कुरियरने आलेल्या क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन ५ रुपये भरण्यास गेलेल्या भाजपा कार्यकर्त्या असलेल्या महिलेने स्वतःच्या खात्यातील दिड लाख रुपये गमावल्याचा प्रकार मीरारोड मध्ये घडला आहे.मीरारोडच्या मेरीगोल्ड भागातील संस्कृती इमारतीत राहणाऱ्या भाजपा कार्यकर्त्या स्वाती बन्साली यांना त्यांचे पती राजकुमार यांनी २३ डिसेंबर रोजी दुपारी कॉल केला. त्यांचे पती वापी येथे भंगार एजंट म्हणून काम करत असून त्यांनी स्वाती यांना सांगितले कि , ब्लु डार्ट कुरीयर मधुन माझे एक्सीस बकेचे क्रेडीट कार्ड आले असुन त्याकरीता मला ऑनलाईन ५ रुपये पाठवायचे आहेत.  पतीस मोबाईलचे व ऑनलाईन बँकींगचे ज्ञान नसल्याने स्वाती यांनी त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रातील खात्याद्वारे गुगल पे ने कुरियर करणाऱ्या समोरील इसमाच्या मोबाईल क्रमांकावर ऑनलाईन ५ रुपये पाठवले . त्यावर कुरियर करणाऱ्या इसमाने स्वाती यांना कॉल करून, तुम्हाला आलेला मॅसेज कॉपी करून दुसऱ्या नंबर वर पाठवा  असे सांगितले . त्या प्रमाणे स्वाती यांनी आलेला मॅसेज दुसऱ्या नंबर वर पाठवला . परंतु कुरियर करणाऱ्या त्या इसमाने पुन्हा स्वाती याना कॉल केला आणि आणखी एक मोबाईल नंबर देत त्याच्यावर तो मॅसेज चार वेळा फॉरवर्ड करा असे सांगितले . स्वाती यांनी त्याच्या सांगण्या नुसार तो मॅसेज ४ वेळा फॉरवर्ड केला . तेव्हा त्या इसमाने ५ रुपये मला मिळाले असे स्वाती यांना कळवले . स्वाती यांना देखील ५ रुपये त्यांच्या खात्यातून गेल्याचा संदेश आला .मात्र दुसऱ्या दिवशी २४ डिसेंबर रोजी दुपारी स्वाती यांना त्यांच्या मोबाईल वर संदेश आला कि , त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्या मधून तब्बल ५ वेळा २० हजार रुपये प्रमाणे एकूण १ लाख रुपये गेले आहेत . ते पाहून धक्का बसलेला असतानाच त्यांना त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून २ वेळा २० हजार आणि एकदा १० हजार असे एकूण ५० हजार रुपये दुसऱ्या खात्यावर गेल्याचे पाठोपाठ संदेश आले .  त्यांनी लगेच दोन्ही बँकेत जाऊन त्यांची खाती बंद करण्यास सांगितली . त्या नंतर त्यांनी पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेत जाऊन तक्रार केली.सायबर गुन्हे शाखेने माहिती घेतली असता स्वाती यांच्या खात्यातून परस्पर वळती केलेली रक्कम हि रणजित कुमार याच्या खात्यात गेली असून त्याचे खाते गोठवण्यात आले . या प्रकरणी २४ डिसेंबर रोजी स्वाती यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस याचा तपास करत आहेत . विशेष म्हणजे ५ रुपये स्वाती यांनी त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून दिले असताना संदेश फॉरवर्ड केल्या वरून सायबर ठिकाने बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून ५० हजार लांबवलेच पण त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातील त्यांचे १ लाख रुपये लांबवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसmira roadमीरा रोडBJPभाजपा