शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ७ किलोमीटर अंतरासाठी तब्बल ८ हजार रुपये भाडे वसूल, संजीवनी अ‍ॅम्बुलन्सवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 15:25 IST

कोरोनाबाधित रुग्णाला नेण्यासाठी ८ हजार रुपये वसूल केल्यानंतर अ‍ॅम्बुलन्सने आणखी १ हजार १०० रुपयांची मागणी केली

पुणे : बिबवेवाडी ते कर्वेनगर कोविड सेंटर या ७ किमी अंतरासाठी तब्बल ८ हजार रुपये भाडे घेणाऱ्या हडपसरमधील संजीवनी अ‍ॅम्बुलन्सवर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक धनंजय गोसावी यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बिबवेवाडी येथील सह्याद्री हॉस्पिटलवरुन दीनानाथ हॉस्पिटल या ७ किमी अंतरासाठी कोरोना बाधित रुग्णाला नेण्यासाठी संजीवनी अ‍ॅम्बुलन्सने ८ हजार रुपये वसुल केले. याशिवाय त्यांच्याकडे आणखी १ हजार १०० रुपयांची मागणी केली होती. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने त्यांना ८ हजार रुपये द्यावे लागले होते़ २५ जून रोजी हा प्रकार घडला होता. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर याबाबत संजीवनी अ‍ॅम्बुलन्सचे बिल टाकून त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाची माहिती दिली होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दिली होती.त्याची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दखल घेऊन अ‍ॅम्बुलन्सवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने फिर्याद देण्यात आली आहे़ आरटीओने ही अ‍ॅम्बुलन्स जप्त केली आहे़.मयुर पुस्तके (रा़ हडपसर) यांच्या मालकीच्या टेम्पो ट्रॅव्हलर हे वाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोबाईल क्लिनिक व्हॅन या सवर्गात नोंदणी करण्यात आलेली आहे़ असे असताना संजीवनी अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिसेस यांनी अ‍ॅम्बुलन्स असे प्रदर्शित करुन रुग्णांकडून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने विहित केलेल्या भाडे दरापेक्षा जादा भाडे आकारुन रुग्णांची व शासनाची फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लिटे अधिक तपास करीत आहेत.याबाबत पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी सांगितले की, आरटीओने अ‍ॅम्बुलन्सने किती दर आकारणी करावी, याचे दर दिले आहेत. त्याचे पालन अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिस देणाऱ्यांनी केले पाहिजे. कोरोना संंसर्ग झाल्याचा गैर फायदा त्यांनी घेऊन नये, तसे आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याNavalkishor Ramनवलकिशोर रामhospitalहॉस्पिटलfraudधोकेबाजीPoliceपोलिस